Nashik Raj Thackeray: नाशिकमधून मनसे फुंकणार निवडणुकीचे रणशिंग; 8 मार्चला ठाकरेंच्या हस्ते श्री काळाराम मंदिरात आरती

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १८ व्या वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा केला जाणार आहे. यानिमित्त ९ मार्चला पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा होईल.
MNS Raj Thackeray
MNS Raj Thackerayesakal

Nashik Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १८ व्या वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा केला जाणार आहे. यानिमित्त ९ मार्चला पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा होईल. मेळाव्याच्या निमित्ताने मनसेकडून निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. यासंदर्भात मनसेच्या राजगड कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. (Nashik Raj Thackeray MNS marathi news)

या वेळी माहिती देताना शहराध्यक्ष सुदाम कोंबडे म्हणाले, ७ ते ९ मार्च असे तीन दिवस राज ठाकरे नाशिक मध्ये राहतील. वर्धापन दिनाच्या निमित्ताने शहर सजविले जाणार आहे. ८ मार्चला सकाळी नऊ वाजता श्री काळाराम मंदिरात राज ठाकरे यांच्या हस्ते आरती होईल. ९ मार्चला कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात मेळावा होईल. मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील.

या वेळी प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. रतनकुमार ईचम, सलीम शेख, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, माजी शहराध्यक्ष दिलीप दातीर, सहकार सेना जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब निमसे, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, धिरज भोसले, नितीन माळी, योगेश दाभाडे, अक्षय खांडरे, मनवीसे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भंवर, शहराध्यक्ष ललित वाघ, मेघराज नवले, मिलिंद कांबळे, नितीन आहेरराव, शाम गोहाड, संदेश जगताप आदी उपस्थित होते. (latest marathi news)

MNS Raj Thackeray
Raj Thackeray Nashik : मी येतोय, तुम्ही तयारीला लागा; राज ठाकरेंचा नाशिकमध्ये तळ

लोकसभेची तयारी

लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणूनही मनसेच्या मेळाव्याकडे पाहिले जात आहे. मनसेकडून नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवार उभा केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनसेच्या सत्ताकाळातील बोटॅनिकल गार्डन, १०० फुटी कारंजा, होळकर पुलावरील वाटर कर्टन, रिंग रोड, सिंहस्थ कुंभमेळा या कामांना उजाळा दिला जाणार आहे.

अर्थपूर्ण संबंधांचा चिखल

महायुतीत मनसे सहभागी होईल किंवा नाही हे अद्याप निश्‍चित नाही. परंतु राजकीय जाणकार मनसे भाजपसोबत जाईल, असे सांगतात. परंतु नाशिकच्या पक्षाच्या मेळाव्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणाला चिखल संबोधल्याने महायुतीतील भाजपसह घटकपक्षांशी दोन हात करण्याचे संकेत मिळत आहे.

सद्यःस्थितीत महाराष्ट्रातील राजकारणात सुरु असलेला चिखल आणि राज्याच्या राजकारणातील अर्थपूर्ण सत्ता संघर्ष बघितला तर येणाऱ्या लोकसभा निवडणूक आणि त्यानंतरच्या विधानसभा आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये राज ठाकरे एकच पर्याय महाराष्ट्राला उरला असल्याचा दावा करण्यात आला.

MNS Raj Thackeray
Nashik Raj Thackeray : राज ठाकरे घेणार श्री काळारामाचे दर्शन, आरती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com