नाशिक-सुरत आता अवघ्या दोन तासांत! मुंबई-पुण्यापेक्षा कमी अंतर

nashik highway.jpg
nashik highway.jpg

नाशिक : गुजरातमधील प्रगत सुरत शहरात नाशिकहून पोचण्यासाठी अवघ्या दोन तासांचे अंतर आता लागणार आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे या शहरांपेक्षा अधिक वेगाने सुरत शहरात नाशिककरांना पोचणार आहे. या माध्यमातून औद्योगीकरणाला चालना मिळण्यासह कृषी माल जलदगतीने मेट्रो शहरांमध्ये पोचण्यास मदत होणार आहे. 

अंतर कमी होणार
सद्यःस्थितीत रस्तेमार्गाने नाशिकमधून विनाअडथळा पुणे येथे पोचण्यासाठी साडेचार तास, मुंबईत साडेतीन तास, तर गुजरातमधील सुरत शहरात पोचण्यासाठी साडेतीन, बडोद्यात साडेचार, तर अहमदाबाद शहरात पोचण्यासाठी साडेपाच तासांचा कालावधी लागतो. भारतमाला प्रोजेक्टअंतर्गत सुरत-चेन्नई ग्रीनफील्ड एक्स्प्रेस वेमधून ही किमया साध्य होणार असून, ​या एक्स्प्रेस वेच्या माध्यमातून अंतर कमी होणार आहे. नाशिकपासून १७६ किलोमीटरवर असलेल्या सुरत शहरात अवघ्या दोन तासांत पोचणे शक्य होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सहा तालुके आणि ७० गावांमधून महामार्ग जाणार आहे. 

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

मुंबईपेक्षा सुरत होणार जवळचे 
नाशिक जिल्ह्याला लागून गुजरातची सीमा आहे; परंतु घाटरस्त्यांमुळे वर्दळ कमी असते. ग्रीन कॉरिडॉरमुळे रस्ते अडथळ्यांची समस्या कमी होऊन प्रगतिशील सुरतमध्ये दोन तासांत रस्ते मार्गाने पोचता येणार आहे. त्यामुळे भविष्यात मुंबईऐवजी उद्योजकांची पसंती सुरत-नाशिकला मिळण्याचे संकेत मिळत आहेत. 

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

ग्रीनफील्ड कॉरिडॉरमध्ये महत्त्वाचे 
* सहापदरी महामार्ग, पाच मीटरचे दुभाजक. 
* नाशिक जिल्ह्यात २६ किलोमीटर जंगल व्यापणार. 
* ग्रीनफील्डमुळे विनाअडथळा प्रवास. 
* सुरगाणा तालुक्यातील संबरकल येथे १.३५ किलोमीटरचा बोगदा. 
* पेठ, सुरगाणामध्ये नऊ डक्ट. 
* महामार्गावर वाहनांसाठी अंडरपास. 
* वावी येथे समृद्धी महामार्गाशी कनेक्ट. 
* नाशिकमधून १२२ किलोमीटर महामार्ग. 
* जिल्ह्यात ९९५ हेक्टर भूसंपादन होणार. 
* नाशिक जिल्ह्यात नऊ हजार कोटींचा खर्च.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com