Nashik Teacher Transfer : शिक्षकांच्या प्रलंबित आंतरजिल्हा बदल्या टप्प्याने करण्यास सरकार सकारात्मक

Transfer News
Transfer Newsesakal

Nashik Teacher Transfer : राज्यात पहिल्या टप्प्यात ३० हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे. तसेच प्रलंबित आंतरजिल्हा बदल्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील, असा सकारात्मक प्रतिसाद राज्य सरकारकडून मिळाला आहे.

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसकर यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. बैठकीनंतर शिक्षक संघटनांकडून ही माहिती देण्यात आली. (Nashik Teacher Transfer Govt positive to carry out pending inter district transfer of teachers in phased manner news)

बैठकीसाठी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, ग्रामविकासचे प्रधान सचिव एकनाथ डवले, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी हे उपस्थित होते. महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे प्रसाद पाटील,

हरीश ससनकर, शिक्षक संघाचे (शिवाजी पाटील गट) केशव जाधव, बापू खरात, शिक्षक संघाचे (थोरात गट) अंबादास वाजे, आबासाहेब जगताप, म. ज. मोरे, शिक्षक समितीचे राजन कोरगावकर, किशोर पाटील, शिक्षक परिषदेचे राजेश सुर्वे, भरत मडगे, शिक्षक भारतीचे नवनाथ गेंड, मिलिंद गांगुर्डे आदींनी चर्चेत भाग घेतला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Transfer News
Rural Police Transfer: नाशिक ग्रामीण पोलीस दलात जम्बो बदल्या! तात्काळ हजर होण्याची पोलीस अधीक्षकांची तंबी

सेवेत एकदा शाळा स्वीकारल्यानंतर त्या शाळेत शिक्षकांनी कायमस्वरूपी राहणे हे विद्यार्थी हिताचे व गुणवत्ता वाढीसाठी योग्य असल्याने नवीन भरतीपूर्व अधिकाअधिक शिक्षकांच्या रिक्तपदांवर व समानीकरणच्या जागेवर सोय करून आंतरजिल्हा बदली पूर्णपणे व जिल्हातंर्गत काही अंशी बंद करण्याच्या विचारात सरकार असल्याचे बैठकीवेळी सांगण्यात आले.

जिल्हातंर्गत झालेला सहावा टप्पा रद्द करावा, अशी मागणी संघटनांनी केल्यावर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करून रद्द केला जाईल, अशी तयारी श्री. केसरकर यांनी दर्शविल्याचे शिक्षक संघटनांतर्फे स्पष्ट करण्यात आले.

शिक्षक भरतीपूर्व गैरसोयीत असलेल्या शिक्षकांच्या समुपदेशन पद्धतीने सर्व रिक्त पदांवर सोयीच्या बदल्या कराव्यात यासह भविष्यात जिल्हातंर्गत विनंती बदल्या किमान ३ टक्के सुरू ठेवाव्यात, असा आग्रह शिक्षक संघटनांनी धरला. त्याबाबत विचार करण्याची तयारी सरकारतर्फे दर्शविण्यात आली.

Transfer News
Ashadhi Cycle Wari : सायकल रॅलीतून देणार पर्यावरण रक्षणाचा संदेश; लासलगावहून रॅली पंढरपूरसाठी रवाना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com