Nashik News : साडेसहा कोटींच्या भाजी मंडईचा वापर होतोय स्वच्छतागृहासारखा

Nashik : गोदाघाटावरील भाजी विक्रेत्यांना हटवून त्यांच्यासाठी गणेशवाडीत तब्बल साडेसहा कोटी रुपये खर्च करून भाजी मंडई उभारली खरी.
Bhaji Mandi's state of disrepair
Bhaji Mandi's state of disrepairesakal

Nashik News : गोदाघाटावरील भाजी विक्रेत्यांना हटवून त्यांच्यासाठी गणेशवाडीत तब्बल साडेसहा कोटी रुपये खर्च करून भाजी मंडई उभारली खरी. परंतु विक्रेत्यांनी या मंडईकडे साफ दुर्लक्ष केल्याने सध्या या मंडईचा वापर परिसरातील फूल, भाजी विक्रेते व भिकारी चक्क स्वच्छतागृह म्हणून करत असल्याचे चित्र आहे. ( vegetable market worth six crore is being used as toilet )

दर बारा वर्षांनी रामतीर्थावर होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी गोदाघाटावरील भाजी विक्रेत्यांचा अडसर नको म्हणून दुतोंड्या मारुती लगतच्या शेकडो भाजी विक्रेत्यांसाठी महापालिकेतर्फे गाडगे महाराज पुलाला खेटून तब्बल साडेसहा कोटी रुपये खर्च करून भव्य भाजी मंडईची उभारणी केली. परंतु विक्रेत्यांनी या ठिकाणी व्यवसाय करण्यास साफ नकार दिल्याने बांधल्यापासून या मंडईचा ताबा भिकारी, व्यसनी, गर्दुल्ले यांनी घेतला आहे, तो आजतागायत.

दोन- चार भाजी विक्रेते व काही फूल विक्रेत्यांचा अपवाद वगळता उर्वरित मंडईचा ताबा भिकाऱ्यांनी घेतल्याने मंडईला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. सध्या मंडईच्या बाहेरील बाजूस सकाळी फूल बाजार बहरतो. शेकडो विक्रेते भल्या सकाळीच येतात. यातील अनेकजण या मंडईचा व तिच्या गच्चीचा वापर चक्क स्वच्छतागृहासाठी करत असल्याने मंडईत कमालीची दुर्गंधी पसरली आहे. मात्र याकडे महापालिका स्वच्छता, आरोग्य विभागाचे साफ दुर्लक्ष होत आहे.(latest marathi news)

Bhaji Mandi's state of disrepair
Nashik News : जिल्हा बॅंक प्रशासक, एमडी यांचा राजीनामा; कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अपशब्द वापरल्याने नाराज

दरवाजे, ग्रील्स गायब

मंडईच्या वरील मजल्यावर जाण्यासाठी लोखंडी दरवाजे बसविण्यात आले होते, परंतु भुरट्या चोरट्यांनी या दरवाजाकडे लोखंडी ग्रील्स गायब केल्याने वरती जाण्यासाठी अडथळाच नाही. त्यामुळे रात्री अनैतिक कामेही बिनदिक्कत सुरू असल्याचे काही व्यावसायिकांनी सांगितले. कधीकाळी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. परंतु ठेकेदाराकडून नियमित वेतन न मिळाल्याने त्यातील अनेक सुरक्षा रक्षकांनी नोकरीला रामराम ठोकला. त्यानंतर सुरक्षारक्षक न नेमल्याने या देखण्या वास्तूला अवकळा प्राप्त झाली आहे.

''नागरिकांच्या कराच्या पैशातून या भाजी मंडईची उभारणी करण्यात आली. परंतु विक्रेते व्यवसायाला राजी नसल्याने तिला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. त्याकडे मनपा प्रशासनाने लक्ष द्यावे.''- उल्हास धनवटे, माजी नगरसेवक

Bhaji Mandi's state of disrepair
Nashik News : शवपेटी मृत्युशय्येवर तर स्मशानभुमी धुळीत! अखेरचा प्रवास समस्यांच्या गर्तेतूनच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com