Nashik: NCPची सुरुवात सिन्नर तालुक्यातुन झाली अन् साथही सिन्नर तालुक्यात देणार; पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

Sharad Pawar vs Ajit Pawar
Sharad Pawar vs Ajit Pawaresakal

विकास गिते

Nashik NCP News : राजकीय वर्तुळात अत्यंत वेगवान घडामोडी घडत असून या घडामोडीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अर्थात अजितदादा पवार व शरद पवार यांच्या दोन्हीही समर्थकांमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी रणशिंग फुंकले आहे.

यात सिन्नर तालुक्यातील अनेक समर्थकांनी अजितदादा पवार व पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी भेटण्यासाठी मुंबई येथे गर्दी केलेली आहे यामध्ये खुद्द आमदार माणिकराव कोकाटे हे अजितदादा पवार यांच्यासोबत असल्याने अनेक समर्थकांमध्ये चलबिचल पाहण्यास मिळत आहे.

यामध्ये आमदार माणिकराव कोकाटे आपली भूमिका समर्थकांमध्ये रविवारी ज्वालामाता लॉन्स येथे मांडणार असून, समर्थक काय सांगतात यावर पुढील निर्णय घेण्याचे आमदार कोकाटे यांनी सांगितले आहे. (NCP started from Sinnar taluka and will continue support in Sinnar taluka Officials reaction Nashik)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर आज शरद पवार आणि अजित पवार यांनी आज स्वतंत्र मेळावे घेऊन शक्ती प्रदर्शन केले. अजित पवारांनी आयोजित केलेल्या मेळाव्यास पक्षाचे बहुसंख्य आमदार उपस्थित आहेत.

नाशिक जिल्ह्यातील पाच आमदार अजित पवार यांच्यासमवेत असून देवळलीस्थित आमदार सरोज आहिरे प्रकृतीचे कारण देत मुंबईत गेलेल्या नाहीत.

अजित पवारांनी एमईटी सभागृहात मेळावा आयोजित केला आहे. यावेळी तीसहून अधिक आमदार उपस्थित आहेत.

नाशिक जिल्ह्यातील छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, नितीन पवार हे पाच आमदार यावेळी उपस्थित आहेत. याशिवाय माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार संजय चव्हाण यांनीही अजितदादा यांच्यामागे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sharad Pawar vs Ajit Pawar
Ajit Pawar NCP : प्रतिज्ञापत्रच घेतलं! अजित पवारांकडे 44 आमदारांचं संख्याबळ?, थोड्याच वेळात सोक्षमोक्ष

"आम्ही राष्ट्रवादी पक्षाचे पक्ष अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत असून शरद पवार हे आमचे नेते सर्वस्व असल्याने अशा वेळेस आम्ही सर्व नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्ष त्यांच्या मागे खंबीर उभा असून त्यांनी घेतलेला जो काही निर्णय असेल त्यात नाशिक जिल्हा हा अग्रेसर राहल्याशिवाय राहणार नाही."- कोंडाजी मामा आव्हाड, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

"सिन्नर तालुका हा सतत आदरणीय शरद पवार यांच्यासोबत राहिलेला असून आत्तापर्यंत राष्ट्रवादी पक्षाला महाराष्ट्रा मधून नाशिक जिल्ह्याने सतत साथ दिलेले आहे अशा वेळेस शरद पवार यांना उतरत्या वयात सात आम्ही देणार असून. अशा वयात त्यांना त्रास होणे चांगले नाही यासाठी आम्ही सर्व शरद पवार यांच्या मागे असून तालुक्यात शरद पवार हे महाराष्ट्राच्या दौऱ्या वेळी येणार असून यावेळी अनेक जुन्या लोकांना तसेच कार्यकर्त्यांना भेटणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. आमदार माणिकराव कोकाटे हे काय निर्णय घेतात हे आता बघणे आहेत."

- जयराम शिंदे, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस

"राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार यांना या वयात महाराष्ट्र फिरवा लागणार असून हे चुकीचे असून त्यांनी जो काही निर्णय घेतलेला असेल तो आम्हाला मान्य आहे आम्ही सतत राष्ट्रवादी पक्षाच्या मागे होतो व आजही राहणार आहे."- राजाराम मुरकुटे, राष्ट्रवादी प्रदेश चिटणीस.

"तालुका हा सतत राष्ट्रवादी पक्षाने जो काही निर्णय घेतलेला असेल त्याच्या मागे ठाम उभा राहिलेला असून आज आम्ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत असून त्यांच्याबरोबर महाराष्ट्रभर फिरू व त्यांना नक्कीच न्याय देऊ" - संदीप शेळके, संघर्ष ग्रुपचे तालुकाध्यक्ष

Sharad Pawar vs Ajit Pawar
Satara Politics : शरद पवार की अजित पवार? NCP पदाधिकाऱ्यांत द्विधावस्था; मुंबईत आज दोन्ही गटांची स्वतंत्र बैठक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com