VIDEO : 26 वर्षात कधी इतका त्रास झाला नव्हता - इंदोरीकर महाराज

indorikar maharaj.jpg
indorikar maharaj.jpg

नाशिक : अपत्यप्राप्तीसाठी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर मंगळवारी (ता.१८) नाशिकच्या आडगावात किर्तनासाठी पोहचले. त्यावेळी त्यांनी 'मला गेल्या 26 वर्षात कधी इतका त्रास झाला नव्हता, तेव्हढा मागील 8 दिवसांत झाला' असे वक्तव्य केले.  

हभप निवृत्ती महाराज (देशमुख) इंदोरीकर आडगावात

मंगळवारी (दि.१८) रोजी शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या आडगावमध्ये शिवजयंतीच्या निमित्ताने हभप निवृत्ती महाराज (देशमुख) इंदोरीकर यांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते. भर उन्हात आडगावमध्ये पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अलोट गर्दी केली होती. इंदोरीकर यांचे आडगावमध्ये आगमन होताच जोरदार स्वागत करण्यात आले. बैलगाडीवरून त्यांची जल्लोषात स्वागत मिरवणूक देखील काढण्यात आली. मिरवणूकीत मोठ्यासंख्येने गावकरी सहभागी झाले होते.
यावेळी इंदोरीकर यांनी आपल्या खास शैलीत किर्तनाला सुरूवात करतांना प्रथम शिवरायांना अभिवादन केले. वयाच्या १६ व्या वर्षी स्वराज्य स्थापनेचा निश्चय करत स्वतःचे स्वराज्य निर्माण करणारे ते पहिले राजे असल्याचे मत प्रस्तावनेत व्यक्त केले. एक गाव एक शिवजयंती साजरी करत गावाच्या एकत्रीकरणाची सुरवात करणा ऱ्या आडगाव ग्रामस्थांचे कौतुक केले. शिवाय, राज्याचे ग्रामविकास खाते ही शिवाजी महाराजांची संकल्पना आहे पुढे सरकारने अनेक योजना सुरु झाले असल्याचे सांगतिले.


क्रांतीचे साक्षीदार व्हा असे ते म्हणाले

तरुणांना त्यांनी नोकरीच्या मागे न लागता आवडीचे क्षेत्र निवडा अपयशाने खचून न जाता प्रयत्न करत राहा, स्वतःचा व्यवसाय करण्याचा सल्ला मार्मिक उदाहरणाद्वारे दिला. 'शिवजयंतीला डी जे, ऑर्केस्ट्रा लावून शिवजयंती साजरी न करता क्रांतीचे साक्षीदार व्हा!' असे आवाहन केले.

तरुणींनी आजच्या सक्षम होणे गरजेचे

तरुणींनी आजच्या सक्षम होणे गरजेचे आहे त्यासाठी मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याचे आवाहन पालकांना केले. तर माणूस मेल्यानंतर राख नदीत टाकून नदीचे प्रदूषण करण्याऐवजी ती राख आपल्या शेतात खड्डा करून पुरावी व त्यांच्या आठवणींसाठी त्याजागेवर झाडे लावण्याचे आवाहन त्यांनी केले.

किर्तनात केले आवाहन

इंदुरीकर महारजांनी समाज प्रबोधन हेतूने मांडलेले प्रमुख मुद्दे याप्रमाणे, तरुणांनी आवडीचे क्षेत्र निवडा, राख नदीत टाकण्या ऐवजी शेतात पुरून झाड लावा, अवयव दान करा, पाणी वाचवा, वीज वाचवा, दंगली करू नका, देशाची सेवा करा, पैसे जपून वापरा व अनावश्यक खर्च टाळा, लग्न सोहळ्याच्या पत्रिका न छापता समाज माध्यमांचा वापर करा असे आवाहन देखील केले.   

मागील काही दिवसांपासून इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्यावरुन मोठा वाद सुरु होता. यावरून इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात आणि समर्थनात असे दोन गट पडले आहेत. मात्र, प्रकरण आणखी जास्त चिघळण्याआधी इंदोरीकर महाराज यांनी दिलगिरी व्यक्त करत, यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com