CM Shinde Group : निवडणुकांसाठी शिंदे गटाकडून नवीन खेळपट्टी; 8 सदस्यांची समिती घेणार सर्वच निर्णय!

Dada Bhuse, Hemant Godse, Suhas Kande, Ajay Boraste, Praveen Tidme, Bhausaheb Chaudhary, Raju Lavate Photo
Dada Bhuse, Hemant Godse, Suhas Kande, Ajay Boraste, Praveen Tidme, Bhausaheb Chaudhary, Raju Lavate Photoesakal

नाशिक : महापालिका, जिल्हा परिषदपंचायत समिती निवडणुकांसाठी शिंदे गटाने कंबर कसली असून, या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जोरदार बॅटिंग करण्यासाठी खेळपट्टी तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.

त्यासाठी आठ सदस्यांची टीम तयार केली असून निवडणुकांसंदर्भात यापुढे आता हीच समिती कामकाज करेल अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. (New pitch from CM Shinde Group for elections All decisions will made by 8 member committee nashik politics News)

Dada Bhuse, Hemant Godse, Suhas Kande, Ajay Boraste, Praveen Tidme, Bhausaheb Chaudhary, Raju Lavate Photo
Maharashtra Politics: शिंदे फडणवीसांच्या अडचणीत वाढ होणार? शपथविधी गोंधळाची धक्कादायक माहिती उघड

मागील वर्षाच्या मार्च महिन्यात महापालिकेसह जिल्हा परिषद व पंचायत समितीची पंचवार्षिक कालावधी संपुष्टात आला आहे. मात्र, ओबीसी आरक्षणासह मराठा आरक्षण व राज्यातील सरकार बदलामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या आहे. अद्यापही निवडणुका होण्याचे कुठलेच संकेत मिळत नाही. निवडणुकांच्या बाबतीत अंदाजे तारीख पे तारीख सुरू आहे.

निवडणुकीसाठी जे इच्छुक तयार झाले होते, त्यांनीदेखील निवडणुका लांबणीवर पडत असल्याने व परिणामी खर्चात वाढ होत असल्याने तलवारी म्यान केल्या आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस तसेच अन्य पक्ष हे पारंपारिक आहेत.

त्यामुळे मतदारांपर्यंत त्यांना पोचणे सहज शक्य आहे, मात्र राज्यात नव्याने स्थापन झालेल्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला मात्र लोकांपर्यंत पोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागेल. त्यात पुन्हा शिवसेनेच्या मूळ धनुष्यबाण चिन्हावरून न्यायालयात लढाई सुरू आहे. न्यायालयाचा निकाल कोणाच्या बाजूने लागेल की शिवसेनेचे चिन्हच गोठविले जाईल, हे अद्यापपर्यंत स्पष्ट नाही.

मात्र, शिंदे गटाच्या बाजूने परिस्थिती सकारात्मक करण्याच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत खेळपट्टी तयार करण्यासाठी शिंदे गटाने आठ सदस्यांची समिती गठित केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून सदरची समिती गठित झाली असून, यापुढे हीच समिती निवडणुकी संदर्भातील काम बघणार आहे.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

Dada Bhuse, Hemant Godse, Suhas Kande, Ajay Boraste, Praveen Tidme, Bhausaheb Chaudhary, Raju Lavate Photo
Politics : भाजपपाठोपाठ शिंदे गटाचाही पवारांना धक्का; अनेक नेत्यांचा मविआला 'रामराम'

संघटनात्मक जबाबदारी

आठ सदस्यांच्या समितीमध्ये बाळासाहेबांची शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी, पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे व नाशिक लोकसभा मतदारसंघाचे सहसंपर्कप्रमुख राजू लवटे यांचा समावेश आहे.

त्याचप्रमाणे संपर्क प्रमुख हे देखील समितीत असतील मात्र संपर्कप्रमुखांचे नाव अद्यापही जाहीर झालेले नाही. निवडणुकीचे नियोजन करण्यासोबतच संघटनात्मक बांधणी, संघटनात्मक निर्णय, विविध आंदोलने व जनजागृती, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने घेतलेले विविध निर्णय यांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवणे हे काम समितीमार्फत केले जाणार आहे.

"स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाची बांधणी तसेच सरकारने सर्वसामान्यांसाठी अंमलबजावणी केलेल्या योजना मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी समिती कार्यरत राहील." - अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख, बाळासाहेबांची शिवसेना.

Dada Bhuse, Hemant Godse, Suhas Kande, Ajay Boraste, Praveen Tidme, Bhausaheb Chaudhary, Raju Lavate Photo
Maharashtra Politics : पुन्हा शिंदे फडणवीसांची दिल्ली वारी; शहां बरोबर खलबतं

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com