Nashik News: पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सरसावली NMC! अमोनियम पावडर वाटपासह घरगुती आरास स्पर्धेचे आयोजन

nmc
nmc esakal

Nashik News : पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेच्या वतीने कृत्रिम तळे निर्माण करण्याबरोबरच अमोनियम पावडर वाटप केली जात आहे.

आता त्याच बरोबर पर्यावरणपूरक उत्सवाला चालना देण्याचा भाग म्हणून घरगुती पर्यावरण पूरक आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

यात प्रथम द्वितीय व तृतीय पुरस्कार महापालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. (NMC for Eco Friendly Ganesh Festival Organization of home made decoration competition with distribution of ammonium powder Nashik News)

श्री गणेश उत्सव २०२३ च्या अनुषंगाने महापालिका हद्दीमध्ये घरोघरी श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने गणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा व्हावा यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना व उपक्रम राबविले जात आहे.

सदर उपक्रम व उपयोजनांमध्ये नागरिकांचा देखील सहभाग असावा व त्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात यावे जेणेकरून नागरिकांना त्यापासून प्रेरणा मिळेल व श्री गणेश उत्सव पर्यावरण पूरक होईल असा महापालिकेचा प्रयत्न आहे.

त्याअनुषंगाने घरोघरी प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या श्री गणेश मूर्तीचे अनुषंगाने शाडू मातीपासून तयार केलेल्या पर्यावरणपूरक श्री मूर्तीची प्रतिष्ठापना, गणेश उत्सव आरास व श्री विसर्जन करणाऱ्या तीन उत्कृष्ट घरगुती आरसाची निवड करून त्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेत प्रथम पारितोषिक दहा हजार, द्वितीय ५ हजार तर तृतीय पारितोषिक ३ हजार रुपये आहे.

nmc
Sangli Ganeshotsav : आकर्षक सजावट, लक्षवेधी मूर्ती; पाहा तासगाव, शिराळा, खानापूर, इस्लामपुरातील बाप्पाची झलक

महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी शाडू माती पासून तयार केलेल्या त्यांच्या घरातील पर्यावरण पूरक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना, गणेशोत्सव आरस व श्री विसर्जंनाचे छायाचित्र महापालिकेच्या संकेतस्थळावर अपलोड करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

विभागीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील घरगुती आरसाची प्रत्यक्ष पाहणी करून त्याप्रमाणे वस्तुनिष्ठ अहवाल समितीकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. प्राप्त अहवालांची पडताळणी करून पारितोषकाबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

जास्तीत जास्त नागरिकांनी स्पर्धेत सहभागी होऊन श्री गणेश उत्सवाचा आनंद द्विगुणित करावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी केले आहे.

nmc
NMC News: सिंहस्थ आराखड्यात दारणातून थेट पाइपलाइनचा समावेश; पाणी पुरवठ्यासह जलशुद्धीकरण केंद्राचा समावेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com