NMC Tax Recovery : शहरातील 378 मोठ्या थकबाकीदारांना जप्तीचे वॉरंट

nmc property tax latest marathi news
nmc property tax latest marathi newsesakal

नाशिक : मार्च अखेरपर्यंत थकबाकी वसुलीचा अंतिम टप्पा गाठण्यासाठी विविध कर विभागाकडून पुन्हा ढोल बजाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. ३३८ थकबाकीदारांकडून ८१ लाख रुपये वसुल करण्यात आले.

ढोल वाजवूनही थकबाकी न भरणाऱ्या ३७८ मोठ्या थकबाकीदारांना जप्ती वॉरंट काढून त्यांच्या मालमत्ता जप्त केल्या जाणार आहेत. मालमत्ता जप्त करून लिलाव केले जाणार आहेत. (NMC Tax Recovery Seizure warrants for 378 big defaulters in city nashik news)

चालु आर्थिक वर्षात महापालिकेच्या उत्पन्नात जवळपास साडेचारशे कोटी रुपयांची तूट आहे. त्यामुळे वसुलीसाठी ७५ हजार थकबाकीदारांना नोटिसा बजावल्या. ५० हजार रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या नागरिकांच्या घरासमोर ढोल बजाओ मोहीम सुरू करण्यात आली.

या मोहिमेतून १० कोटी रुपये वसुल करण्यात आले. दिवाळीत मोहीम स्थगित करण्यात आली होती. मार्चअखेर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुन्हा सहा पथकांच्या माध्यमातून ढोल बजाव मोहीम सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

nmc property tax latest marathi news
Nashik News : बागलाण, मालेगाव रस्त्यांसाठी 32 कोटीचा निधी

आठ दिवसात ३३८ थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल वाजवून सव्वा कोटी रुपये थकबाकी पैकी ८१ लाख ४० हजार रुपये वसुल करण्यात आले. ५० हजार रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या थकबाकीदारांना जप्ती वॉरंट बजावले जात असून ३७८ थकबाकीदारांना जप्ती वॉरंट बजावण्यात आले.

पश्चिम विभागात १३७, सिडको ८१, नाशिक रोड ५०, पूर्व ३१, पंचवटी ४८ व सातपूर विभागातील ४४ थकबाकीदारांना वॉरंट बजावण्यात आले. २१ दिवसात थकबाकी अदा न केल्यास थेट मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाणार आहे.

nmc property tax latest marathi news
Unique Tradition : वडांगळीकरांची जावयासाठीची जगावेगळी प्रथा! जाणुन घ्या नक्की भानगड काय?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com