....यामुळे स्मशानभूमीकडे न जाता अंत्ययात्रा निघते थेट नदीकिनारी!

antyayatra 1.jpg
antyayatra 1.jpg

नाशिक : गेल्या बारा वर्षांपासून मोसम खोऱ्यात दुष्काळसदृश परिस्थिती होती. मात्र यंदा जोरदार पाऊस झाल्याने तळवाडे, इजमाने, टेंभे या गावांचे नदी-नाले भरून वाहू लागले. त्यामुळे वाटोली नदीतून बारा वर्षांत पहिल्यांदा पाणी पाहिले. बिजोरसे गावापासून अर्धा किलोमीटरवर स्मशानभूमी आहे. पण तरीदेखील..

यासाठी अंत्ययात्रा निघते नदीकिनारी....

 बारा वर्षांपासून मोसम खोऱ्यात दुष्काळसदृश परिस्थिती होती. मात्र यंदा जोरदार पाऊस झाल्याने तळवाडे, इजमाने, टेंभे या गावांचे नदी-नाले भरून वाहू लागले. त्यामुळे वाटोली नदीतून बारा वर्षांत पहिल्यांदा पाणी पाहिले. बिजोरसे गावापासून अर्धा किलोमीटरवर स्मशानभूमी आहे. पण त्या ठिकाणी जायला रस्ताच नाही. स्मशानभूमीच्या ठिकाणी शेडही नसल्याने उन्हात किंवा पावसातच सर्वांना उभे राहावे लागते. या संदर्भात प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही त्याचा उपयोग झालेला नाही. त्यामुळे रस्ता त्वरित करावा अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. 

नाहीतर आंदोलन करू..

गेल्या पावसाळ्यात स्मशानभूमीजवळचा रस्ता पाण्यात वाहून गेल्याने नदीकिनाऱ्यावरच अंत्यसंस्कार करावे लागतात. त्यामुळे हा रस्ता तत्काळ न केल्यास सरपंच संदीप मोरे, उपसरपंच योगेश काकडे, शेखर मोरे, रवींद्र मोरे, रावसाहेब काकडे, निंबा काकडे, कैलास काकडे, शशिकांत काकडे आदींनी तहसीलदार जितेंद्र इंगळे यांना दिलेल्या निवेदनात आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com