Nashik : फराळाच्या गोडव्यानंतर मांसाहारावर ताव; विक्रीच्या दुकानांवर गर्दी

Non Veg Sell Increased
Non Veg Sell Increasedesakal

जुने नाशिक : दिवाळीनिमित्त गेल्या आठ दिवसांपासून दिवाळी फराळ व मिठाईच्या गोडव्यानंतर नागरिकांकडून आता मांसाहारावर ताव मारला जात आहे. मासे विक्रेतापासून ते चिकन विक्रीच्या दुकानावर खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसत आहे.

दिवाळी सण म्हटला, की सर्वत्र आनंदोत्सव असतो. घरोघरी विविध मिठाई व फराळ तयार केले जातात. सर्व बांधव एकमेकांच्या घरी जाऊन दीपावलीच्या शुभेच्छा देतात. फराळ व मिठाईचे सेवन केले जाते. आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार मिठाईने करत त्यांचे तोंड गोड केले जाते. (Non Vegetarian Food sales Increased after Diwali Nashik News)

Non Veg Sell Increased
Airline Department : नाशिकची विमानसेवा 2 आठवड्यांसाठी बंद

त्याचप्रमाणे एकमेकांना भेट वस्तूसह मिठाईचा बॉक्स दिला जातो. इतकेच नव्हे, तर कामगार वर्गासही त्यांच्या मालकांकडून मिठाई दिली जात असते. घरी येणारे पाहुणे रिकाम्या हाती न येता मिठाई घेऊन येत असतात. त्यामुळे दिवाळी उत्सवाच्या आठ दिवस सतत फराळ आणि मिठाईचे सेवन केल्याने तोंडाचा गोडवा वाढला आहे.

प्रत्येकाची काहीतरी ठसठशीत चटकदार आणि खमंग खाण्याची इच्छा होत आहे. त्यामुळे सर्वांचा कल मांसाहार सेवनाकडे आहे. बहुतांशी नागरिकांनी मांसाहाराचा पाहुणचार करण्यास पसंती दर्शवली. घरोघरी मासे, चिकन, मटणाचा अशा खमंग सुगंध सर्वत्र दरवळत आहे. इतकेच नाही, तर भाऊबीजनिमित्त अनेक भाऊरायांच्या घरी माहेरवाशीनी बहीण कुटुंबीयांसह आल्याने त्यांचा पाहुणचार चांगला झाला पाहिजे. या उद्देशाने अनेक भावांनी त्यांच्यासाठी दिवाळी फराळासह मांसाहाराचा पाहुणचार दिला.

Non Veg Sell Increased
Nashik : MPSC गट ‘क’ सेवा संयुक्‍त पूर्व परीक्षा शनिवारपासुन सुरू

दिवाळी सुट्टीचे औचित्य साधत पर्यटनस्थळी भेट देणारेही मांसाहाराचे पार्सल बरोबर घेऊन जात आहेत. नाशिक परिसरातील मांसाहाराच्या हॉटेल्समध्ये जेवणासाठी गर्दी केल्याचे बघावयास मिळत आहे.

हॉटेलमध्ये लगबग

केवळ मांसाहार तयार करणाऱ्या केटर्सच्या दुकानावर बिर्याणी, मटन भाजी, पुलाव तयार करून घेण्यासाठी गर्दी होत आहे. पुढील पाच ते सहा दिवस मांसाहारी पदार्थांना मागणी असणार आहे. यामुळे हॉटेल आणि केटर्स व्यवसायिकांना सुगीचे दिवस आल्याचे भासत आहे.

Non Veg Sell Increased
Nashik : मराठी Number plate असणाऱ्या वाहनांना दंड न करण्याची मागणी

असे आहे दर

मांसाहार प्रकार दर (किलोत)

मटन ६००

चिकन २००

मासे १५० ते २ हजार रुपये

बोमिल २००

"दिवाळीचे पाच ते सहा दिवस व्यवसायात मंदी होती. त्या तुलनेत रविवारपासून मांसाहारास मागणी वाढली आहे."

-सद्दाम मुलतानी, चिकन विक्रेता

Non Veg Sell Increased
Nashik : बाजारपेठेत दिवाळी Feverकायम; खरेदीसाठी महिलांची गर्दी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com