नाशिक रोड : महसूल विभागाची छप्परफाडके कमाई | Latest nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Revenue collected

महसूल विभागाची छप्परफाडके कमाई

नाशिक रोड (नाशिक) : नाशिक जिल्ह्यात सध्या बांधकाम क्षेत्र स्थावर मालमत्ता शेत जमीन निवासी- अनिवासी मालमत्तेची खरेदी विक्री सध्या जोमात सुरू आहे. त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला मोठा बुस्ट मिळाला आहे.

अशातच गेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच एक एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या आर्थिक वर्षात शासनाच्या १०९. ८६ टक्के इष्टांक साध्य झाला असून शासनाच्या तिजोरीत १८७८.५७ कोटींची कमाई झाली आहे. ही आकडेवारी लक्षात घेता नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर या पाच जिल्ह्यांचा ५४ तालुक्यातील उत्तर महाराष्ट्राने (Uttar Maharashtra) राज्याचे एकूण महसुलात (Revenue) छप्परफाडके भर टाकली आहे.

१ सप्टेंबर २०२० ते ३१ मार्च २०२१ पर्यंत शासकीय मुद्रांक शुल्कात (स्टॅम्प ड्यूटी) मध्ये नागरिकांना मिळालेल्या सुटीमुळे बाजारात स्थावर मालमत्तेचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर झाले. त्याचा फायदा शासनाच्या महसुलात वाढ होण्यास झाला शिवाय बाजारात पैसा खेळता राहण्यास मदत होत आहे. मार्च पर्यंत गेल्या आर्थिक वर्षात नाशिक जिल्ह्यात एक लाख ३७ हजार ६६७ दस्त नोंदणी झालेली असून १०८.६२ टक्के महसूल प्राप्त झाला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात ९४ हजार २२५ नोंदणीतून ९८.८३ टक्के महसूल जमा झाला आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये ९६ हजार ९९४ दस्त नोंदणी झाली असून शासनाच्या महसुलात १२२.७७ टक्के भर पडली आहे. धुळे जिल्ह्यामध्ये ३३ हजार ५५५ दस्त नोंदणी झालेली असून शासनाच्या महसुलात १३३.०६ टक्के महसूल जमा झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये १६ हजार ६४५ नोंदवण्यात आले असून ११३.५८ टक्के महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे. शासनाने ठरवून दिलेल्या इष्टांक पेक्षा जास्त महसूल नाशिक विभागाने गोळा केलेला असून खरेदी-विक्रीच्या व्यवहारामध्ये शासनाला छप्परफाडके महसूल मिळाल्याचे नोंदणी उपमहानिरीक्षकांनी ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले.