Nashik Cyber Police : सावधान! सोशल मीडियावर आक्षेपार्ह मेसेज टाकाल तर.... सायबर सेलची आहे करडी नजर

Offensive messages on social media will be registered as crime by cyber police nashik news
Offensive messages on social media will be registered as crime by cyber police nashik newsesakal

Nashik Cyber Police : राज्यासह देशभरात घडणाऱ्या काही सामाजिक, राजकीय घटनांसंदर्भात सामाजिक तेढ निर्माण होईल, असे आक्षेपार्ह संदेशाचे पेव सोशल मीडियावर वाढले आहे.

त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा सायबर सेल ‘अलर्ट’ मोडवर असून, सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मेसेज‌वर सायबर पोलिसांकडून सर्चिंग करून गुन्हे दाखल केले जाणार आहेत. (Offensive messages on social media will be registered as crime by cyber police nashik news)

काही दिवसांपासून राज्यासह देशपातळीवर राजकीय व सामाजिक घडामोडी घडत आहेत. त्यातच, सध्या मणिपूरमधील प्रश्न ज्वलंत असून, काही राज्यांमध्ये धार्मिक तेढ निर्माण होऊन तणावाचे वातावरण आहे, तर राज्यातही शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी महापुरुषांविषयी वादग्रस्त विधान केले आहे. त्यावरूनही राज्यात वादंग उठले आहे.

ट्विटर, फेसबुक आणि व्हॉट्सॲप यावर सातत्याने सामाजिक, राजकीय वादग्रस्त विषयांचे पडसाद उमटत असतात. सध्या सोशल मीडियावर त्यासंदर्भात आक्षेपार्ह मेसेजचे पेव फुटले आहे. सोशल मीडियावर या आक्षेपार्ह संदेशातून सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गेल्या आठवड्यात शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी महापुरुषांविषयी वादग्रस्त विधान केले. त्यावरून सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्याचे पडसाद सोशल मीडियावर असणाऱ्या समर्थकांमधून उमटत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Offensive messages on social media will be registered as crime by cyber police nashik news
Social Media Day : सोशल मीडिया तुमच्यासाठी, की तुम्ही सोशल मीडियासाठी? कोण कुणाचा करतंय वापर?

त्यावरून ट्विटर आणि व्हॉट्सॲप या संकेतस्थळावर मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह संदेश व्हायरल होत आहेत. त्यातून सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांच्या सायबर सेलकडून बारकाईने नजर ठेवली जात आहे.

ट्रेडिंगवर नजर

सोशल मीडियावर सातत्याने एकापेक्षा अनेक विषयांवर संदेश व्हायरल होत असतात. परंतु एखाद्या वादग्रस्त विषयावर जास्त संदेश व्हायरल होत असताना अशा ट्रेडिंग संदेशावर सायबर सेलकडून बारकाईने नजर ठेवली जात आहे. तसेच आक्षेपार्ह संदेश असतील, तर त्यासंदर्भात संबंधित सोशल मीडियावर यंत्रणेकडे रिपोर्ट करून सदर संदेश तातडीने हटविले जात आहेत.

मात्र, व्हॉट्सॲपवर असे आक्षेपार्ह संदेश व्हायरल होत असतील, तर त्यावरही सायबर सेलमार्फत ‘वॉच’ ठेवला जात आहे. आक्षेपार्ह वा सामाजिक तेढ निर्माण करणारा संदेश असल्याने संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचाही इशारा शहर पोलिसांनी दिला आहे.

"सामाजिक तेढ निर्माण होतील, असे मेसेज सोशल मीडियावर कोणीही व्हायरल करू नये; अन्यथा गुन्हे दाखल केले जातील." - प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, शहर गुन्हे शाखा

Offensive messages on social media will be registered as crime by cyber police nashik news
Social Media : 'फ्रेंड्स'च करतायत फसवणूक; अशी घ्या खबरदारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com