मालेगाव हिंसाचार : आक्षेपार्ह क्लिप Viral, नगरसेवकाला बेड्या

malegaon violence
malegaon violenceesakal

नाशिक : मागच्या काही दिवसांमध्ये त्रिपुरात (Tripura) दोन समुदायांमध्ये तणाव वाढला आहे. त्रिपुरात मशिदीमध्ये (Mosque) नुकसान केल्याच्या काही घटना घडल्या होत्या. त्याचे पडसाद शुक्रवारी महाराष्ट्रात (Maharashtra) उमटले. उत्तर त्रिपुरा जिल्ह्यात दोन ते तीन हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला होता. त्यामध्ये मोर्चेकऱ्यांनी मशिदीचं नुकसान केलं होतं. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी महाराष्ट्रात मुस्लिम संघटनांनी ठिकठिकाणी मोर्चे काढले होते. यावेळी हिंसाचार, तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेवरून महाराष्ट्रात मालेगावही पेटले. त्याचे पडसाद राज्यभर इतर ठिकाणी नांदेड आणि अमरावतीमध्ये पसरले. मात्र आता आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप तयार करून व्हायरल केल्याने अनेक भागात वातावरण चिघळले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका नगरसेवकाला बेड्या ठोकल्या आहेत.

मालेगाव हिंसाचार : आक्षेपार्ह क्लिप Viral, नगरसेवकाला बेड्या

मालेगाव हिंसाचार प्रकरणातील सूत्रधाराला शोधून काढण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. दरम्यान आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप तयार करून व्हायरल केल्याने अनेक भागात वातावरण चिघळले आहे. एका नगरसेवकाने आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केली. त्यात त्रिपुरा येथे मुस्लिम नागरिकांवर अन्याय होत आहे. तिथले दंगे रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे, असे म्हणत ती क्लिप इतर चौघांच्या मदतीने वेगवेगळ्या ग्रुपवर फॉरवर्ड केली. 8 नोव्हेंबरला हा प्रकार घडल्याचे समजते. आझादनगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून संबंधित नगरसेवक अयाज हलचल (corporator Ayaz Halchal) ला बेड्या ठोकल्या आहेत.

अनेकजण पोलिसांच्या रडारवर

देशभरात घडलेल्या या सर्व हिंसेचे मूळ बांगालदेशमध्ये आहे. बांगलादेशात नवरात्रौत्सवादरम्यान दुर्गा पूजेचे काही मंडप उद्धवस्त करण्यात आले होते. त्याच रागातून त्रिपुरामध्ये आयोजित केलेल्या मोर्चामध्ये मशिदीचं नुकसान करण्यात आले. त्याचे पडसाद शुक्रवारी महाराष्ट्रात उमटले. अगोदरच वातावरण पेटल्याने ठोस पुरावे गोळा करणे आणि त्यानंतरच कारवाई करणे सुरू आहे. मालेगाव हिंसाचारामागे काही धार्मिक नेत्यांची फूस आहे का? या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अनेकजण पोलिसांच्या रडारवर आहेत. काही जणांना ताब्यात घेतले असून, काही जणांना ताब्यात घेण्याचा हलचाली सुरू आहेत. मात्र, पोलिस प्रत्येक पाऊल खूप खबरदारीने टाकत आहेत.

malegaon violence
मोदींविरोधात विरोधकांकडे चेहरा नाही? शरद पवारांनी दिलं उत्तर

500 जणांच्या जमावावर पोलिसांनी गु्न्हा दाखल

मालेगावमध्ये झालेल्या हिंसाचाराचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. महसूल विभागाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यात दगडफेकीमध्ये 11 लाख 12 हजार रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या हिंसाचाराबद्दल आतापर्यंत जवळपास 500 जणांच्या जमावावर पोलिसांनी गु्न्हा दाखल केला आहे. तर त्यांच्यावर विविध पाच प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, सीसीटीव्ही फुटेज तपासून त्यांना ताब्यात घेणे सुरू आहे. मालेगावमध्ये जमावाने जुना आग्रा रोड, बसस्थानक, किदवाई रोडवर हैदोस घातला. हॉटेल, दुकाने, घरांवर दगडफेक केली. पोलिसांची वाहने फोडली. त्यात तीन पोलीस अधिकारी, सात जवान जखमी झाले. ही तीव्रता पाहता अजूनही पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यासाठी बाहेरून कुमक मागवली आहे. मात्र, सध्या शहरात शांतता आहे.

malegaon violence
दिल्ली प्रदुषणाला शेतकरी नाही तर कोण जबाबदार? सुप्रीम कोर्टाने म्हटलं...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com