Hindu Jan Akrosh Morcha : जुने नाशिक परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप

हिंदू जनआक्रोश मोर्चानिमित्त रविवारी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक भद्रकाली पोलिस ठाण्यात तळ ठोकून होते.
Police deployment in Khadkali signal area on Sunday for the march.
Police deployment in Khadkali signal area on Sunday for the march.esakal

Hindu Jan Akrosh Morcha : हिंदू जनआक्रोश मोर्चानिमित्त रविवारी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक भद्रकाली पोलिस ठाण्यात तळ ठोकून होते. तर जुने नाशिक परिसरात ठिकठिकाणी शस्त्रधारी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात होता.

संपूर्ण भागाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. (Old Nashik locality in form of police camp due to Hindu Jan Akrosh Morcha nashik news)

दरम्यान, मुख्य बाजारपेठेतून मोर्चा काढल्याने बाजारपेठही बंद राहून सर्वत्र शुकशुकाट होता. आमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सकल हिंदू समाजतर्फे वक्फ बोर्ड आणि कायद्याविरोधात रविवारी (ता. ११) सायंकाळी बी. डी. भालेकर मैदान येथून हिंदू जनआक्रोश मोर्चा निघाला.

मोर्चाचे स्वरूप बघता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी शालिमार बाजारपेठ पूर्ण बंद होती. मेन रोड बाजारपेठेतील बहुतांश व्यावसायिकांनीही त्यांचे व्यवसाय बंद ठेवले होते. त्यामुळे दिवसभर बाजारपेठेत शुकशुकाट होता. सायंकाळी मात्र मोर्चातील आंदोलकांमुळे बाजारपेठ गजबजली.

Police deployment in Khadkali signal area on Sunday for the march.
Hindu Jan Akrosh Morcha : भुईकोट किल्ला अतिक्रमण मुक्त करा; नीतेश राणेंचे प्रशासनाला आवाहन

दूध बाजार, चौकमंडई, बागवानपुरा, कथडा, शिवाजी चौक, नानावली चौक यासह येथील विविध भागात सशस्त्र अतिरिक्त पोलिस तैनात होता. संपूर्ण जुने नाशिक परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवाजी चौक कथडा भागात झालेल्या दगडफेकीमुळे राणे या भागात येणार असल्याचीही चर्चा होती.

यामुळे खबरदारी घेत भद्रकाली पोलिस ठाण्यासह मुख्यालयातील बंदोबस्त तैनात होता. मोर्चानिमित्त खडकाळी सिग्नल येथून जीपीओ रोडमार्गे वाहतूक वळविण्यात आली होती. शालिमारकडे जाणारा मार्ग बॅरिकेडिंग करून बंद केल्यामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.

Police deployment in Khadkali signal area on Sunday for the march.
Hindu Jan Akrosh Morcha : जनआक्रोश मोर्चासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com