esakal | शेवटी कंटाळली 'ती' त्याच्या सततच्या छळाला..अन्..

बोलून बातमी शोधा

woman molest.png

म्हसरूळ परिसरातील खासगी रुग्णालयात नोकरीला होती. संशयित हिरामण धनश्रीला वारंवार फोन करायचा आणि तिला लग्नासाठी गळ घालत होता. तिने नकार दिल्यानंतरही संशयिताने तिला लग्न करण्यासाठी धमकावले होते. त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून धनश्रीने शेवटी...

शेवटी कंटाळली 'ती' त्याच्या सततच्या छळाला..अन्..
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : म्हसरूळ परिसरात ऑगस्ट 2019 मध्ये युवतीचा मृत्यू विषारी औषध घेतल्याने झाल्याचे व्हिसेरा अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यावरून पोलिस तपासामध्ये संशयित युवकाच्या एकतर्फी प्रेमाच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी संशयित युवकाला अटक करण्यात आली. 

असा घडला धक्कादायक प्रकार...

हिरामण किलबिले (वय 21, रा. पिंगळे मळा, गंगावाडी, मखमलाबाद शिवार, पंचवटी) असे संशयित युवकाचे नाव आहे. धनश्री झिंजुर्डे असे युवतीचे नाव आहे. धनश्री म्हसरूळ परिसरातील खासगी रुग्णालयात नोकरीला होती. संशयित हिरामण धनश्रीला वारंवार फोन करायचा आणि तिला लग्नासाठी गळ घालत होता. तिने नकार दिल्यानंतरही संशयिताने तिला लग्न करण्यासाठी धमकावले होते. त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून धनश्रीने 25 ऑगस्ट 2019 ला विषारी औषध सेवन केले. त्यानंतर तिला खासगी रुग्णालयाच्या बाहेर चक्कर आली आणि ती पडली. त्यानंतर तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाला.

हेही वाचा > PHOTOS : "तूच का पेटवून घेते, मीच पेटवून घेतो' असे म्हणून तिच्या हातातील बाटली ओढली...पण...

विषसेवनामुळे मृत्यू झाल्याचे व्हिसेरा अहवालातून उघड 

या प्रकरणी शवविच्छेदन केल्यानंतर तिचा व्हिसेरा तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविला होता. हा अहवाल म्हसरूळ पोलिसांना मिळाल्यानंतर त्यातून तिने विषारी औषध सेवन केल्यामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी तपास केल्यानंतर संशयित हिरामण किलबिले याच्या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे समोर आले. 

हेही वाचा > "माझ्यासोबत गाडीवर चल" असे सांगून तिला घरी घेऊन गेला..अन्..