esakal | कांद्याच्या भावात अल्प घसरणीचा ‘ट्रेंड'! पाकचा कांदा भारताच्या तुलनेत अरब राष्ट्रांमध्ये निम्म्या भावात 

बोलून बातमी शोधा

onion market.jpg

अवकाळी पावसानंतर सोमवारी (ता. ११) सुरू झालेल्या लिलावांमध्ये नवीन लाल कांद्याच्या भावात काहीसा घसरणीचा ‘ट्रेंड’ राहिला. गेल्या आठवड्यात सरासरी क्विटंलचा भाव तीन हजार रुपयांच्या पुढे पोचलेला असताना आज मात्र तीन हजारांच्या आत भाव निघाला

कांद्याच्या भावात अल्प घसरणीचा ‘ट्रेंड'! पाकचा कांदा भारताच्या तुलनेत अरब राष्ट्रांमध्ये निम्म्या भावात 
sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : अवकाळी पावसानंतर सोमवारी (ता. ११) सुरू झालेल्या लिलावांमध्ये नवीन लाल कांद्याच्या भावात काहीसा घसरणीचा ‘ट्रेंड’ राहिला. गेल्या आठवड्यात सरासरी क्विटंलचा भाव तीन हजार रुपयांच्या पुढे पोचलेला असताना आज मात्र तीन हजारांच्या आत भाव निघाला. अरब राष्ट्र आणि दुबईसाठी पाकचा कांदा टनाला ३०० ते ३२० डॉलर भावाने विकला जात असताना भारतीय कांद्याचा भाव ६०० डॉलरपर्यंत पोचला आहे. 

पाकचा कांदा भारताच्या तुलनेत अरब राष्ट्रांमध्ये निम्म्या भावात 
गुजरातमधील कांद्याची आवक वाढत असताना महाराष्ट्रातील नवीन लाल कांद्याची आवक वाढणार आहे. त्यामुळे आठवडाभरानंतर स्थानिक बाजारपेठेतील कांद्याचे भाव काय राहणार, हा खरा प्रश्‍न आहे. त्यातच, उत्तर भारतामध्ये संक्रांतीसाठी वाढलेली मागणी संक्रांतीनंतर कमी होणार आहे. त्याचवेळी पाक आणि चीनचा भारताने कांदा निर्यातबंदी उठवल्यापर्यंत पाठवलेला कांदा परदेशी बाजारपेठेत विकला जाणार असल्याने संक्रांतीनंतर निर्यातीचा वेग वाढण्याची चिन्हे आहेत. वाढलेल्या आवकच्या पार्श्‍वभूमीवर स्थानिक बाजारपेठेतील कांद्याचे भाव कमी झाल्यास निर्यातीचा वेग आणखी वाढण्याची शक्यता निर्यातदारांना वाटते आहे.

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

सरासरी भावावर शेतकऱ्यांना समाधान

ही सारी कांद्याच्या आगारातील स्थिती असली, तरीही मुंबईमध्ये गेल्या आठवड्याप्रमाणे आजही क्विटंलचा भाव तीन हजार १५० रुपये असा राहिला आहे. शिवाय एकीकडे कळवणध्ये तीन हजार आणि उमराणेमध्ये तीन हजार १०० रुपये, असा भाव मिळाला असला तरीही सटाण्यात मात्र दोन हजार ५७५ रुपये क्विंटल या सरासरी भावावर आज शेतकऱ्यांना समाधान मानावे लागले. त्याचवेळी मागील आठवड्याच्या तुलनेत येवला, लासलगाव, चांदवड, देवळ्यात आज भाव कमी मिळाला आहे. 

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा
नवीन लाल कांद्याच्या भावाची स्थिती 
(आकडे क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये) 

बाजारपेठ सोमवार (ता. ११) शनिवार (ता. ९) 
येवला दोन हजार ७५० तीन हजार 
लासलगाव तीन हजार तीन हजार १०० 
मुंगसे दोन हजार ९५० दोन हजार ९३० 
चांदवड तीन हजार तीन हजार १०० 
मनमाड दोन हजार ९०० दोन हजार ७०० 
देवळा तीन हजार ५० तीन हजार २०० 
पिंपळगाव दोन हजार ९५१ दोन हजार ९०१