esakal | शेतकऱ्यांच्या दणक्‍यासह क्विंटलला कांदाभावात वृद्धी..! 
sakal

बोलून बातमी शोधा

onion market.jpg

कांद्याचे आगर असलेल्या नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपूर्वी 15 रुपये किलो या घाऊक भावाने कांदा विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. भाव घसरण्याच्या भीतीमुळे शेतकऱ्यांनी तयार न झालेला कांदा विक्रीसाठी आणणे पसंत केले होते. मात्र निर्यातबंदी उठविण्याच्या मागणीचा जोर वाढून आंदोलनात सातत्य राहिल्याने शेतकऱ्यांनी आता कांदा बाजारात आणण्याकडील हात आखडता घेतला आहे. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार 50 टक्‍क्‍यांनी काही ठिकाणची आवक कमी झाली होती. 

शेतकऱ्यांच्या दणक्‍यासह क्विंटलला कांदाभावात वृद्धी..! 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कांदा निर्यातबंदी उठविण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांनी दणका देण्याचा सपाटा सुरू ठेवलेला असताना बाजारपेठेत क्विंटलमागे दोनशे ते चारशे रुपयांनी कांद्याच्या भावात वृद्धी झाली आहे. बिहार-उत्तर प्रदेशात कांद्याला चांगली मागणी वाढण्याबरोबर शेतकऱ्यांनी निर्यातबंदी उठेल, या अपेक्षेने आवक नियंत्रणात ठेवली आहे. हीच स्थिती कायम राहिल्यास भाव आणखी वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

बिहार-उत्तर प्रदेशात चांगली मागणी; आवक ठेवली नियंत्रणात 

हवामानामुळे शेतकऱ्यांना रांगड्या कांद्याचे अपेक्षित उत्पादन मिळत नाही. त्यामुळे देशांतर्गत मागणीच्या तुलनेत कांदा उपलब्ध होण्याचे गणित बिघडताना दिसत आहे. त्यामुळे मुंबईत एक हजार 800 रुपये क्विंटल भावापर्यंत घसरलेला कांदा सोमवारी (ता. 10) दोन हजार 50 रुपयांना सरासरी भावाने विकला गेला. पुण्यात एक हजार 800, कोल्हापूरमध्ये एक हजार 600, सोलापूरमध्ये एक हजार 300, जळगावमध्ये एक हजार 300 रुपये असा भाव मिळाला. आग्र्यामध्ये तीन हजार 80, कर्नूलमध्ये एक हजार 630, सुरतमध्ये एक हजार 875, बेंगळुरूमध्ये महाराष्ट्रातील कांद्याला एक हजार 750 आणि स्थानिक कांद्याला एक हजार 900, इंदूरमध्ये दोन हजार रुपये क्विंटल असा सरासरी भाव राहिला. सटाण्यामध्ये एक हजार 875, कळवणमध्ये दोन हजार 100 रुपये सरासरी भावाने कांदा शेतकऱ्यांनी विकला. 

निर्यातबंदी उठविण्याच्या मागणीचा जोर

कांद्याचे आगर असलेल्या नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपूर्वी 15 रुपये किलो या घाऊक भावाने कांदा विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. भाव घसरण्याच्या भीतीमुळे शेतकऱ्यांनी तयार न झालेला कांदा विक्रीसाठी आणणे पसंत केले होते. मात्र निर्यातबंदी उठविण्याच्या मागणीचा जोर वाढून आंदोलनात सातत्य राहिल्याने शेतकऱ्यांनी आता कांदा बाजारात आणण्याकडील हात आखडता घेतला आहे. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार 50 टक्‍क्‍यांनी काही ठिकाणची आवक कमी झाली होती. 

हेही वाचा > मुलाचे निधन एका बाजूलाच...सुन अन् सासू- सासऱ्यांचं भलतचं चाललयं!

कांद्याचे आजचे बाजारभाव 
(आकडे क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये) 
0 येवला  2 हजार 50 
0 लासलगाव  2 हजार 150 
0 मुंगसे  1 हजार 750 
0 मनमाड  1 हजार 850 
0 देवळा  2 हजार 100 
0 उमराणे 1 हजार 800 
0 पिंपळगाव 1 हजार 951 

 PHOTOS :..अन् "चिमुकलीने" तोंडात रुपयाचे नाणे टाकले..ते गिळले सुध्दा!..धक्कादायक!

loading image