ऑनलाइन कल्चरमुळे तरूण पिढी गेमिंगच्या आहारी

mobile game
mobile game esakal
Summary

विज्ञानाच्या सहाय्याने तंत्रज्ञान क्षेत्रात अभूतपूर्व असे बदल घडले. मानवी जीवनाला आणि जागतिक स्पर्धेसाठी ते नक्कीच आवश्यक असले तरी काही गोष्टींचा वाजवीपेक्षा जास्त वापर झाल्याने काही क्षेत्रात तंत्रज्ञानाचा विपर्यास झाला आहे. सध्याची तरुण पिढी अशाच प्रकारे गेमिंगच्या आहारी गेली आहे. ज्यामुळे मानवी जीवनावरच नाही तर तरुण पिढीच्या आरोग्यावरदेखील घातक परिणाम होत आहेत.

सोनज (जि. नाशिक) : एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानाने नक्कीच कात टाकली. विज्ञानाच्या सहाय्याने तंत्रज्ञान क्षेत्रात अभूतपूर्व असे बदल घडले. मानवी जीवनाला आणि जागतिक स्पर्धेसाठी ते नक्कीच आवश्यक असले तरी काही गोष्टींचा वाजवीपेक्षा जास्त वापर झाल्याने काही क्षेत्रात तंत्रज्ञानाचा विपर्यास झाला आहे. सध्याची तरुण पिढी अशाच प्रकारे गेमिंगच्या आहारी गेली आहे. ज्यामुळे मानवी जीवनावरच नाही तर तरुण पिढीच्या आरोग्यावरदेखील घातक परिणाम होत आहेत. (Online-games-detrimental-to-future-of-younger-generation-nashik-marathi-news)

संगणक क्रांतीने ग्रामीण भागातील खेळ संपुष्टात

काही वर्षांपूर्वी ‘ब्लू व्हेल’ गेमने जगभरात हाहाकार माजविला होता. भारतात या गेमच्या आहारी जाऊन अनेकांनी आपला जीव गमावला. परिणामी सर्वोच्च न्यायालयापासून ते केंद्र सरकार, मानसोपचारतज्ज्ञ आणि पालकदेखील यातून आपली सुटका करून घेण्यासाठी उपाययोजना करताना दिसून आले. टाइमपास व कामाच्या ताणातून हलके होण्यासाठी विरंगुळा म्हणून खेळ खेळणे नवीन नाही. पूर्वी कॅरम, बुद्धिबळ असे बैठे तसेच मैदानी खेळही खेळले जायचे. ग्रामीण भागात विटी-दांडू, सूर-पारंब्या, लपंडाव, कबड्डी आदी खेळ प्रचलित होते. संगणक क्रांतीनंतर असे खेळ हळूहळू करत संपुष्टात आले. मैदानी खेळांची जागा डिजिटल खेळांनी घेतली. गेमच्या आहारी गेलेले तरुण पायी चालताना, बँकांच्या लाइनमध्ये, हॉटेलमध्ये चहा घेताना, वेळ मिळेल तिथे अगदी ट्रॅफिक सिग्नलच्या काही सेकंदातही गेम्स खेळताना दिसतात.

mobile game
गृहकर्ज घेणे झाले महाग; ग्राहकांच्या खिशाला बसणार झळ

गेम्सचे व्यसन

मोबाईल गेम खेळण्याचे प्रमाण सगळ्याच वयोगटांमध्ये आहे. लहान मुले, तरुणाईत हे प्रमाण जास्त असून, हा वर्ग मोबाईल गेमच्या अधिकच आहारी गेला. तंत्रज्ञानाच्या वाढत्या टप्प्यात ऑनलाइन गेम खेळणे वाढत आहे. जास्तीत जास्त टास्क, मारहाण अशा गेम्सना जास्त पसंती दिली जाते. प्रसिद्ध सिनेमा, त्याचे नायक, एखादा सुपरव्हिलन गेमचा नायक असतो. नायक-खलनायकांची पात्रे घेऊन गेम तयार होतात. यातूनच गेम्सचे व्यसनच जडते. मानसोपचारतज्ज्ञांच्या मते अनेक कारणांमुळे मुले हिंसक होत आहेत. अलीकडे त्याचे प्रमाण वाढत आहे.

mobile game
तब्बल 37 वर्षे दिव्यांग पतीची सावित्रीकडून अविरत सेवा!

पालक म्हणून आपण काय करू शकतो?

कुटुंबातील हरवलेला संवाद पुन्हा प्रस्थापित करण्याची गरज आहे. लहान मुले घरात असली, की त्यांच्याबरोबर विविध खेळ खेळावेत. त्यांना कोणत्या तरी ॲक्टिव्हिटीमध्ये गुंतवावे. चित्रे काढायला सांगावे, कल्पक वृत्तीला चालना देण्यासाठी त्या प्रकारचे क्रिएटिव्ह वातावरण तयार करावे. डोक्याला ताण देणारी आणि त्यासोबत त्यांचा विकास होईल अशी एखादी गोष्ट केल्यास ती नक्कीच फायदेशीर ठरू शकते.

''इलेक्ट्रॉनिक गॅझेटमुळे मुलांना अनेक आजार जडले. पाठदुखी, डोळ्यात जळजळ, डोळ्यात पाणी येणे, डोकेदुखी, भूक न लागणे, मळमळणे, बोटे बधिर होणे, झोप न येणे, हाताची बोटे अकडणे, अचानक चक्कर येणे, स्मरणशक्ती कमी होणे, कामात लक्ष न लागणे, चिडचिडेपणा अशा अनेक समस्या जाणवत आहेत. लहान मुलांसाठी सामान्यतः स्क्रीन टाइम हा दिवसातून फक्त दोन तास असावा. पालकांनी याची काळजी घेणे जास्त गरजेचे आहे.'' -डॉ. पीयूष रणभोर, बालरोगतज्ज्ञ, मालेगाव

(Online-games-detrimental-to-future-of-younger-generation-nashik-marathi-news)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com