fertilizer
fertilizersakal

नाशिक : कांद्यासाठी संयुक्त खतांऐवजी सरळ खतांचा शेतकऱ्यांना पर्याय

कृषी विभागाने जारी केले आवाहनपत्र
Published on

नाशिक : जिल्ह्यात कांद्याचे क्षेत्र (Area of onion)मोठ्या प्रमाणात आहे. त्यासाठी शेतकऱ्यांकडून १०:२६:२६, डीएपी अशा संयुक्त खतांची (Compound fertilizer)मागणी वाढली आहे, पण सद्यःस्थितीत संयुक्त खतांचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी आहे, हे मान्य करत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाने सोमवारी (ता. १७) सरळ खतांचा पर्याय शेतकऱ्यांपुढे (farmer)ठेवला आहे. त्यासंबंधीचे आवाहनपत्र प्रसिद्धीला दिले आहे.

fertilizer
नाशिक : कोरोनाबळींच्या आकडेवारीत महापालिकेची दडवादडवी

संयुक्त खतांऐवजी बाजारात उपलब्ध सरळ खतांपैकी कमी खर्चात पिकासाठी आवश्‍यक नत्र, स्फुरद, पालाश देणारे खत शेतकऱ्यांनी निवडावे. विशिष्ट खतावर अवलंबून न राहता कमी खर्चात अन्नद्रव्य कसे देता येईल, हे पाहणे महत्त्वाचे आहे.संयुक्त खताऐवजी शेतकऱ्यांनी सिंगल सुपर फॉस्फेट, एमओपी व यूरिया या सरळ खतांचे मिश्रण करून पिकास देण्यातून खर्चात बचत होऊ शकते. सिंगल सुपर फॉस्फेट खतात काही उत्पादकांनी झिंक व बोरॉनयुक्त असे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यातून पिकास सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा देता येईल, असा सल्ला कृषी विभागाचा आहे. कृषी सेवा केंद्रातून खताची खरेदी करताना ई-पॉस यंत्राद्वारे आपल्या आधारकार्डचा वापर करून खते पक्क्या बिलात घ्यावीत. खत उपलब्धतेत अडचणी असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे स्पष्ट केले आहे. १०:२६:२६ संयुक्त खताच्या बॅगेची किंमत एक हजार ४७० ते एक हजार ६४० रुपये आहे. त्यातून किलोमागे नत्र ५, स्फुरद आणि पालाश प्रत्येकी १३ उपलब्ध होते.

fertilizer
प्रजासत्ताक दिनी PM मोदींना धोका, सुरक्षा यंत्रणांना 'हायअलर्ट'

पर्यायी खतांच्या मिश्रणामध्ये यूरिया अर्धी गोणी, सिंगल सुपर फॉस्फेट तीन गोण्या, एमओपी अर्धी गोणी याची किंमत एक हजार ५९३ ते एक हजार ६४३ रुपये होती. त्यातून १०.३५ नत्र, २४ स्फुरद आणि १५ पालाश, सल्फर १६-५ मिळते. तसेच २४:२४:०० या खताच्या बॅगेची किंमत एक हजार ७०० रुपये आहे. त्यातून १२ नत्र, १२ स्फुरद किलोमध्ये मिळते. त्याऐवजी यूरिया दीड गोणी, सिंगल सुपर फॉस्फेट तीन गोण्या या खताच्या मिश्रणाची किंमत एक हजार ३६० रुपये होती आणि त्यातून ३१ नत्र, २४ स्फुरद, १६.५ सल्फर मिळते. याशिवाय डीएपीच्या बाराशे रुपयांच्या खतातून बॅगेमधील प्रत्येक किलोमध्ये ८ स्फुरद, ११ सल्फर मिळते. त्यापेक्षा यूरियाची अर्धी गोणी, सिंगल सुफर फॉस्फेटच्या तीन गोण्यांचे मिश्रण एक हजार ९३ रुपयांमध्ये उपलब्ध होते. त्यातून किलोला १०.३५ नत्र, २४ स्फुरद, १६.५० सल्फर उपलब्ध होते, अशीही माहिती कृषी विभागाने दिली..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com