Nashik News: ‘ओझर मिग एअरफोर्स’ ने घेतले जानोरी गाव दत्तक

Ozar MiG Air Force
Ozar MiG Air Forceesakal

Nashik News : तालुक्यातील जानोरी हे गाव ओझर येथील एअर फोर्स प्रकल्पाच्या वतीने दत्तक घेण्यात आले त्यामुळे जानोरी परिसरातील राहिलेला ग्रामीण विकास सोयी सुविधा तसेच विद्यार्थी वर्गाला लागणारी विविध विषयावर मार्गदर्शन हे एअर फोर्स ओझरने दत्तक घेतल्या कारणाने केंद्र सरकारच्या विविध योजनांचा निधी सीएसआर या ठिकाणी खर्च होणार असून त्यामुळे भौगोलिक सुविधा विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयात मार्गदर्शन केले जाणार आहे. (Ozar MiG Air Force adopted Janori village Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Ozar MiG Air Force
Nashik: वेतन रखडल्याने गटसचिवांचे कामबंद आंदोलन; सहकार खात्याअंतर्गत सर्व निवडणूकांच्या कामकाजावर बहिष्कार

संबंधित अधिकाऱ्यांनी जानोरी ग्रामपंचायतचे सरपंच सुभाष नेहरे, उपसरपंच हर्षल काठे यांची भेट घेऊन केंद्र सरकारच्या माध्यमातून स्थानिक सीएसआर व विविध प्रकारचा निधी या ठिकाणी खर्च केला जाणार असल्याचे सांगितले.

यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी योगासन आहार व्यायामाचे महत्त्व शारीरिक क्षमता विचार आचरण प्लास्टिक वापर प्रदूषण तसेच पुनर्वापर वस्तू ई कचरा संगणक व भरती बाबत माहिती देण्यात आली.

महात्मा फुले विद्यालयाचे स्कूल कमिटी चेअरमन शंकरराव काटे, ग्रामपंचायत सदस्य गणेश विधाते, तंटामुक्त समितीचे रविचंद्र वाघ, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन दामू तिडके, संतोष विधाते, महात्मा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक नंदलाल निकम, शिक्षक दिवे, ग्रामस्थ दिलीप वाघ, शरद घुमरे, उत्तम विधाते व शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Ozar MiG Air Force
Dhanoli Small Irrigation Project: धनोली लघुपाटबंधारे प्रकल्पास दुसरी प्रशासकीय मान्यता : नितीन पवार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com