Panchavati Expressमधील 40 वर्षाची नवरात्रोत्सवाची परंपरा खंडित

Nashik Panchavati Express
Nashik Panchavati Expressesakal

नाशिक रोड : रेल्वे प्रशासनाने पंचवटी एक्स्प्रेसमध्ये यंदा नवरात्रोत्सव साजरा करायला परवानगी न दिल्यामुळे पंचवटीची चाळीस वर्षांपासूनची नवरात्रोत्सव परंपरा खंडित होणार आहे. त्यामुळे प्रवासी भक्तांमध्ये सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता पसरली आहे.

रोजगार आणि ब्रेडबटर देणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसला प्रवासी आपली आई मानतात. दोन वेळा लिम्का बुकमध्ये नोंद झालेल्या पंचवटीमधून नोकरदार, व्यापारी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला प्रवासी प्रवास करतात. म्हणून पंचवटी एक्स्प्रेसमध्ये चाळीस वर्षापासून हा उत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो. दोन महिन्यांपासून पत्रव्यवहार करून, बैठका होऊनही पंचवटीमध्ये नवरात्रोत्सवाला परवानगी मिळाली नाही. (Panchavati Express Breaks 40 Years of Navratri Festival Tradition Nashik Latest Marathi News)

Nashik Panchavati Express
PFIच्या मालेगातील आणखी 2 कार्यकर्त्यांना अटक

म्हणूनच प्रवाशांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. मुंबई- मनमाड- मुंबई पंचवटी गाडी अर्धशतकापासून सुरू आहे. पंचवटीसाठी स्वतंत्र गाडी होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून हीच गाडी जालना शताब्दी एक्स्प्रेस म्हणून वापरली जात आहे. त्यामुळे नाशिककरांचे सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम बंद करावे लागले आहेत. पंचवटीमध्ये नवरात्रीला घट स्थापना करून आंबेमातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाते.

मुंबई, भुसावळ, नाशिक रोड येथील रेल्वे अधिकाऱ्यांना दोन महिन्यांपासून मासिक पासधारक व प्रवासी वेल्फेअर संघटनेचे अध्यक्ष राजेश फोकणे, उपाध्यक्ष किरण बोरसे, संजय शिंदे, रतन गाढवे, परशराम शिंदे, पंचवटी प्रवासी संघटनेचे बाळासाहेब केदारे, कैलास बर्वे, देविदास पंडित, अरुण गिरजे, मनोहर पगारे, सोमनाथ कासार, आनंद मुकणे आदींनी पत्रव्यवहार, गाठीभेटी घेतल्या. पंचवटीसाठी पूर्वीप्रमाणेच स्वतंत्र गाडी (रेक) देण्याची मागणी केली. मात्र, ती फेटाळण्यात आल्याने नाराजी पसरलेली आहे.

"अनेक वर्षांपासूनची परंपरा खंडित झाल्याचे दुःख होत आहे. यासाठी पंचवटी एक्स्प्रेस साठी पूर्वीप्रमाणेच स्वतंत्र रेल्वेगाडी द्यावी. नवरात्रोत्सव साजरा करायला प्रशासनाने परवानगी न दिल्यामुळे प्रवाशांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे."

- किरण बोरसे, उपाध्यक्ष प्रवासी संघटना

Nashik Panchavati Express
दसऱ्याच्या दिवशी गांधीनगरला 53 फुटी रावण दहन; यंदाचे 67 वे वर्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com