River Pollution : गोदावरीचे पात्र पानवेलींने व्यापले

Panveli Is occupied Godavari river nashik news
Panveli Is occupied Godavari river nashik newsesakal
Updated on

River Pollution : महापालिकेकडून पानवेली हटविण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो. मात्र पानवेली काही हटता हटत नसल्याचे दिसून येत आहे.

तपोवन भागातील सरस्वती पुलाच्या खाली गोदावरी नदीचे संपूर्ण पात्र पानवेलींनी आच्छादिले आहे. (Panveli Is occupied Godavari river nashik news)

पुलावरून नजर टाकल्यास लॉन्स तयार झाल्याचे दिसून येते. गोदावरीचे संपूर्ण पात्र पानवेलींनी अच्छादल्याने डोळ्यांना छान दिसत असले तरी पानवेली होण्यामागे प्रदूषित पाणी कारणीभूत असल्याचे स्पष्ट होते.

पानवेली हटविण्यासाठी महापालिकेकडून दरवर्षी करोडो रुपयांची तरतूद केली जाते. मात्र संपूर्णपणे पानवेली हटविल्या जात नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Panveli Is occupied Godavari river nashik news
Nashik Agriculture News : सोयाबीन, भुईमूग, नागली, उडीदाच्या क्षेत्रात वाढ; खरीपाची पेरणी शक्य

आसाराम बापू पूल, फॉरेस्ट नर्सरी, सोमेश्वर, नवशा गणपती या भागातदेखील गोदावरी नदीची अशीच स्थिती आहे.

सध्या पावसाचे वेध लागले आहे. पावसामुळे गोदावरी नदीला पूर येईल व पुरात पानवेली वाहून जातील, असा अंदाज गोदावरी संवर्धन कक्षाला असावा अशी चर्चा आहे.

त्यामुळेच जैसे-थे परिस्थिती ठेवून पानवेली काढण्याचे कंत्राट दिलेल्या कंत्राटदारावर पालिका प्रशासन मेहरबान तर नाही ना, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Panveli Is occupied Godavari river nashik news
Asian Track Cycling Competition : एशियन ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत शिया लालवानीचे यश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.