esakal | "यंदाची गुढी ही कोरोनावर विजय मिळवणारी" मी घरी थांबणार..कोरोनाला हरवणार...!
sakal

बोलून बातमी शोधा

gudhipadwa.jpg

येत्या काही दिवसांत नागरिकांनी पुरेशी दक्षता बाळगून कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या दिशेने खबरदारी घेतली जाणे अत्यावश्यक आहे. यंदा सर्व मंदिरे बंद ठेवण्यात आली असून, मंदिरांमध्ये जाऊन देवदर्शनाची मुभा नाही. त्यामुळे नागरिकांनी घरातच थांबून एकमेकांना शुभेच्छा संदेश देत गुढीपाडवा साजरा करणेच समाजाच्या हिताचे म्हणून पसंद केले

"यंदाची गुढी ही कोरोनावर विजय मिळवणारी" मी घरी थांबणार..कोरोनाला हरवणार...!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक :  यंदाची गुढी ही कोरोनावरील विजय मिळवणारी विजयपताका ठरणार असा निश्चय करीत घरोघरी गुढीपाडवा साजरा केला जाणार आला. कौटुंबिक आरोग्यासह सामाजिक आरोग्यदेखील सुदृढ राहण्यासाठी प्रत्येकाने घरातच राहून जमेल तसा हा सण साजरा करणेच पसंद केले आहे. यंदाच्या गुढीपाडव्याच्या उत्साहावर कोरोनाचे सावट पसरले असून हिंदू नववर्षावर अर्थात गुढीपाडव्यावर प्रथमच महामारीचे संकट कोसळले आहे. त्यावर मात करीत लवकरच ईडा पिडा टळो अशी भावना यानिमित्त व्यक्त करण्यात आली आहे.

भोगावर योगाचा विजय, वैभवावर विभूतीचा विजय आणि विकारावर विचारांचा विजय
भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस गुढीपाडवा या नववर्षाच्या स्वागत सणाचे महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. या दिवसाला भोगावर योगाचा विजय, वैभवावर विभूतीचा विजय आणि विकारावर विचारांचा विजय मिळविण्याचा प्रातिनिधिक दिन मानले जाते. त्यानुसार घराबाहेर गुढी उभारून हिंदू नववर्षाचे स्वागत देवदर्शन करून करण्यात येते. मात्र, यंदा प्रथमच काळाराम किंवा भद्रकाली देवी या ग्रामदैवतांच्या दर्शनाविना भाविकांना नूतन संवत्सरास प्रारंभ करावा लागला. ही गुढी स्नेहाची, मांगल्याची आणि आनंदाची प्रतीक मानली जाते. प्रत्येक नववर्ष हे आपल्यासह कुटुंबाला भरभराटीचे जावो, हाच संकल्प असतो.

हेही वाचा > पोल्ट्री व्यवसायाला जिल्हा पोलिस अधीक्षक आरती सिंह यांचा दिलासा...लॉकडाऊनमध्येही मिळणार चिकन अन् अंडी!

नागरिकांनी पुरेशी दक्षता बाळगावी..!

येत्या काही दिवसांत नागरिकांनी पुरेशी दक्षता बाळगून कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या दिशेने खबरदारी घेतली जाणे अत्यावश्यक आहे. यंदा सर्व मंदिरे बंद ठेवण्यात आली असून, मंदिरांमध्ये जाऊन देवदर्शनाची मुभा नाही. त्यामुळे नागरिकांनी घरातच थांबून एकमेकांना शुभेच्छा संदेश देत गुढीपाडवा साजरा करणेच समाजाच्या हिताचे म्हणून पसंद केले आहे. नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आहे. या दिवशी घराच्या अंगणात गुढी उभारण्यात येते. गुढी म्हणजे उंच बांबूची काठी, त्यावर रेशमी वस्त्र, कडुनिंबाची डहाळी, आंब्याची पाने, सुगंधी फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी बांधून त्यावर स्टीलचा, तांबे, पितळेचा तांब्या बसवून गुढी साकारली जाते. 

हेही वाचा >"घरात कंटाळा येतोय.. विनाकारण घराबाहेर पडायचयं? तर घ्या मग पोलिसांतर्फे मोफत मसाजसेवा!"....सोशल मिडीयावर व्हायरल​