Nashik Cidco Crime : सोशल मीडिया पोस्ट बनली सिडकोतील 'त्या' युवकाच्या हत्येचे कारण...

Nashik Cidco Crime : सोशल मीडिया पोस्ट बनली सिडकोतील 'त्या' युवकाच्या हत्येचे कारण...

Nashik Cidco Crime : काही दिवसांपूर्वी पाथर्डी फाटा येथे झालेल्या भांडणात संशयित ओमप्रकाश चौधरी ऊर्फ छोटा ओम्या खटकी व त्याच्या साथीदारास बेदम मारहाण करीत शिवीगाळ केली होती.

त्याला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओही सोशल मीडियावर प्रसिद्ध केला होता. या बाबीचाच राग मनात धरून हा खून झाला असल्याचे तपासात समोर येत आहे.(person murdered due to his social media post nashik cidco crime news)

संदीप आठवले हल्ल्यातील एका संशयिताने हल्ला केल्यावर सोशल मीडियावर लाइव्ह करीत मृत संदीप हा दोन टोल्यात मेला, सोशल मीडियावर ओम्या खटक्याचे खूप लाइव्ह करायचा ना, आता इतक्यात हे पाहा, शर्टावर रक्त असा उल्लेख त्याने त्याच्या स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवरून व्हिडिओ शेअर करीत केला होता.

गुरुवारी (ता. २४) दुपारी साडेचारच्या सुमारास मृत संदीप हा सिडको परिसरातील शिवाजी चौक येथील भाजी मार्केट परिसरात पाणीपुरी खाण्यासाठी आला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nashik Cidco Crime : सोशल मीडिया पोस्ट बनली सिडकोतील 'त्या' युवकाच्या हत्येचे कारण...
Nashik Crime: सिडकोतील शिवाजी चौकात युवकाचा चाकू भोसकून खून; अंबड हद्दीत महिन्याभरात खूनाची चौथी घटना

या वेळी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार केला. हल्ल्यात संदीप आठवले याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता.

या खून प्रकरणात सनी राजू आठवले यांच्या फिर्यादीवरून संशयित ओमप्रकाश पवार ऊर्फ मोठा ओम्या खटकी, ओमप्रकाश चौधरी ऊर्फ छोटा खटकी, साईनाथ गणेश मोरताटे ऊर्फ मॅगी मोर्या, अनिल प्रजापती, बाळा वडनेरे यांच्यासह तीन विधीसंघर्षित बालकांविरुद्ध खुनाचा तसेच ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाच संशयितांना न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

Nashik Cidco Crime : सोशल मीडिया पोस्ट बनली सिडकोतील 'त्या' युवकाच्या हत्येचे कारण...
Nashik Crime News : पिंपळगाव बसवंतला एटीएम फोडून 28 लाखांची चोरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com