esakal | धक्कादायक! खाकी वर्दीवर कोरोनाचा घाला; आणखी एका योध्दाच्या मृत्यूने परिसरात हळहळ
sakal

बोलून बातमी शोधा

police sunil shinde.jpg

कोरोनाविरुद्ध लढताना पोलिसांना सातत्याने ड्युटी करावी लागत आहे. देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. सामान्य नागरिकांबरोबर वैद्यकीय कर्मचारी, पोलीस आणि संरक्षण दलातील जवानांना देखील कोरोनाची बाधा होत आहे.

धक्कादायक! खाकी वर्दीवर कोरोनाचा घाला; आणखी एका योध्दाच्या मृत्यूने परिसरात हळहळ

sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

नाशिक / सिडको : कोरोनाविरुद्ध लढताना पोलिसांना सातत्याने ड्युटी करावी लागत आहे. देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. सामान्य नागरिकांबरोबर वैद्यकीय कर्मचारी, पोलीस आणि संरक्षण दलातील जवानांना देखील कोरोनाची बाधा होत आहे. महाराष्ट्रातील पोलिसांना कोरोनाची बाधा तसेच मृत्यूचा आकडा वाढतच चालल्याने चिंतेत भर पडली आहे.

 पोलिस उपनिरीक्षकाचे निधन 

अंबड पोलिस ठाण्यात ठाणे अंमलदार या पदावर कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुनील नारायण शिंदे (वय ५५) हे कोरोनाशी लढा देत असताना सोमवारी (ता. २४) त्यांचा मृत्यू आला. त्यांना श्वसनाचा त्रास झाल्याने त्यांना उपचारार्थ इस्पितळात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे.  

हेही वाचा > पहाटेची वेळ...मंदिरात आश्रयाला थांबलेले गुराखी दुर्गंधीने अस्वस्थ; शोध घेताच बसला धक्का

हेही वाचा > भरचौकात 'त्याने' थेट वाहतूक पोलिसाच्याच श्रीमुखात भडकावली...नेमके काय घडले?

संपादन- ज्योती देवरे

loading image