Nashik News: पोलिस, जवानांनी सजविली गावची वेस! सोनज येथे स्वखर्चातून केले काम

भारतीय सेना, पोलिस अन छत्रपती शिवरायांचे नाव
Vishwanath Maharaj Wadekar while inaugurating the gate
Vishwanath Maharaj Wadekar while inaugurating the gateesakal

Nashik News : सोनज गाव पंचक्रोशीत नोकरदारांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. दोन दशकांपर्यंत सोनजला शिक्षकांचे गाव म्हणून देखील सर्वत्र ओळख होती.

परंतु गेल्या दशकभरापासून सोनज गावातील किमान शंभरहून अधिक तरुण हे पोलिस दलात व भारतीय सैन्यात देशसेवेसाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे शिक्षकांसोबतच सैनिकांचे गाव म्हणून सोनज नावारूपाला आले आहे.

याच सैनिकांनी आणि पोलिसांनी ग्रामपंचायतीतर्फे गावाच्या वेशीचे सजविण्याचे काम हाती घेतले आणि स्वखर्चाने वेशीची रंगरंगोटी करीत अतिशय आकर्षक वेश तयार केली आहे. तिचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. (Police jawans decorated village boundry Worked at Sonaj at self expense Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Vishwanath Maharaj Wadekar while inaugurating the gate
Nashik Rain Update: पालखेडमधून डाव्या कालव्याला पूरपाणी; वाघाड, पुणेगाव ओव्हरफ्लो

देशसेवेसोबतच आपण गावाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून या तरुणांनी गावाची वेश सुशोभित केली आहे. या वेशीचे उद्घाटन विश्वनाथ महाराज वाडेकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

या वेशीवर भारतीय सेना आणि महाराष्ट्र पोलिसांसोबतच राजे शिवछत्रपती प्रवेशद्वार असे नाव देण्यात आले. छत्रपती शिवरायांची सुरेख तसबीर देखील त्यावर रंगविण्यात आलेली आहे. त्यामुळे सोनज गावाच्या सौंदर्यात नक्कीच भर पडली आहे.

वेशीच्या उद्घाटनावेळी बाजार समितीचे माजी संचालक संग्राम बच्छाव, साहेबराव बच्छाव, सरपंच जयश्री पिंपळे, राजेंद्र अहिरे, रवींद्र बच्छाव, गोकूळ बच्छाव, दिनेश बच्छाव, महेंद्र बच्छाव, गणेश बच्छाव यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, रहिवासी तसेच पोलिस दलातील तसेच भारतीय सैन्यातील जवान उपस्थित होते.

Vishwanath Maharaj Wadekar while inaugurating the gate
Nashik Onion Rates: मुंगसे उपबाजारात कांद्याला सातशे ते बावीसशेच भाव! 10 हजार क्विंटल कांद्याची आवक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com