पाथर्डी फाटा : विजेच्या टॉवरवर चढलेला मजुर
पाथर्डी फाटा : विजेच्या टॉवरवर चढलेला मजुर esakal

अतिउच्च दाबाच्या विजेच्या टॉवरवर ‘हाय व्होल्टेज ड्रामा’

इंदिरानगर : मुरलीधरनगरमधील भाजी बाजारजवळील अतिउच्च दाबाच्या विजेच्या टॉवरवर शुक्रवारी (ता. ३) रात्री साडेनऊच्या सुमारास मजूर नेतीराम पकाराम वाघाडे चढल्याने सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला होता. सुमारे ६० मीटर उंचीच्या टॉवरवर ४० फुटापर्यंत तो गेला. तिथून काही अंतरावर अतिउच्च दाबाच्या वीजतारा होत्या.

पाथर्डी फाटा : विजेच्या टॉवरवर चढलेला मजुर
शिपाई ते विद्यार्थिप्रिय शिक्षक, कवी, गझलकार कमलाकर देसले यांचे निधन

तेथे मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले आणि त्याला खाली उतरण्याचे आवाहन करू लागले. दरम्यान, एकाने येथील सामाजिक कार्यकर्ते एकनाथ नवले यांना ही बाब कळवली. त्यांनी तातडीने पोलिसांनाही माहिती दिली. अवघ्या पाच मिनिटात इंदिरानगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक सुरेश पवार, भाऊराव गवळी, संदीप लांडे, मनीष चौधरी, अशोक कराड आणि सुधाकर आव्हाड तेथे पोचले. त्यांनी खालूनच या त्याच्याशी संवाद साधण्यास सुरवात करून त्यांना समजावत खाली उतरण्यास सांगितले. त्यांचे ऐकून तो खाली उतरला. पोलिसांनी त्यांना आपल्या वाहनात बसवत पाणी पाजले आणि विचारपूस करत आपल्यासोबत नेले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. नेतीराम नागपूर येथील रहिवासी असून, सिन्नर परिसरात मजुरी करतात, असे समजते.

पाथर्डी फाटा : विजेच्या टॉवरवर चढलेला मजुर
तहानलेल्या मोराचा पाण्याच्या शोधात विहिरीत पडून मृत्यू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com