पाऊस काही उघडेना, खड्डे वाहने पळू देईना!

Potholes latest news
Potholes latest newsesakal

नाशिक : पावसाची संततधार आणि शहरातील रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांमुळे रहदारी संथ होऊन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. शहर वाहतूक पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची जबाबदारी महापालिकेची असून, त्या संदर्भात पाठपुरावा करण्यात आला आहे. तसेच द्वारका व मुंबई नाका सर्कलची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सर्कलचा आकार कमी करण्याची मागणीही महापालिकेकडे वाहतूक पोलिस शाखेने केली आहे. (potholes problematic for drivers Nashik Latest Marathi News)

गेल्या महिनाभरापासून संततधार सुरू आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले असून, रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. विशेषत: प्रत्येक चौकामध्ये धोकादायक खड्डे झाले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनांची रहदारी संथ होऊन त्याचा अतिरिक्त ताण सिग्नल यंत्रणेवर पडला आहे.

परिणामी सर्वच सिग्नलवर खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. या संदर्भात पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाहतूक शाखेच्या उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी व वाहतूक शाखेच्या चारही विभागांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची संयुक्त बैठक बुधवारी (ता. १७) पार पडली.

Potholes latest news
Monsoon Update : संततधार पावसाचा ऑगस्‍टमध्येही विक्रम

या बैठकीमध्ये शहरातील वाहतुकीच्या कोंडीबाबत सविस्तर चर्चा करून त्यावरील उपाययोजनांबाबत महापालिकेकडे पाठपुरावा करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार, सिग्नल असलेल्या चौकांतील खड्डे तातडीने बुजविण्याबाबत महापालिकेकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे, तसेच नित्याची वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची संख्या वाढविणे,

रहदारी वाढीच्या वेळी अधिक नियंत्रितपणे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या उपस्थितीत नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, जेणेकरून वाहतूक कोंडी सोडवून नागरिकांना त्रास कमी करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्याबाबतच्याही सूचना पोलिस आयुक्त नाईकनवरे यांनी दिल्या आहेत.

"पावसामुळे रस्त्यांवर खड्डे वाढले असून, त्यामुळे वाहतूक संथ होते. तसेच, पाऊस सुरू असेल तर चारचाकी वाहनांची रस्त्यावरची संख्या वाढते. त्याचा अतिरिक्त ताण वाहतुकीवर येतो. खड्ड्यांबाबत मनपाकडे पाठपुरावा करण्यात आला असून, तातडीने खड्डे बुजविण्याची मागणी केली आहे. कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांची संख्या वाढविण्यात आली आहे."

-सीताराम गायकवाड, सहाय्यक पोलिस आयुक्त, शहर वाहतूक शाखा

Potholes latest news
Corona Update : महिन्‍याभरानंतर कोरोनाचा बळी; दिवसभरात 19 पॉझिटिव्‍ह

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com