चर्मकार व्यावसायिकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न; दुसऱ्या लाटेत व्यवसायाची बिकट अवस्था

घर खर्च कसा करतो हे माझ्या जिवाला माहीत, अशी उदिघ्न करणारी प्रतिक्रिया चर्मकार व्यावसायिकांनी दिली आहे.
Dilip Suranje
Dilip Suranje

नाशिक : कोरोचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढल्याने राज्य सरकारने कठोर निर्बंधानंतर लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला. यामुळे अनेक व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. त्यात चर्मकार व्यावसायिकासमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट झाला आहे. घर खर्च कसा करतो हे माझ्या जिवाला माहीत, अशी उदिघ्न करणारी प्रतिक्रिया चर्मकार व्यावसायिकांनी दिली आहे.

नाशिक शहरात अनेक हातावर पोट असणारे चर्मकार व्यावसायिक आहेत. त्यामुळे हातावर पोट असलेल्या व्यावसायिकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. गेल्यावर्षी मार्चमध्ये लॉकडाउननंतर चर्मकार व्यावसायिकासमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न होता. सरकारने गेल्यावर्षी मदत केली नाही. बचत केलेल्या पैशातून तेव्हा घर चालले. अनलॉकनंतर परिस्थिती सुरळीत होत आहे, असे वाटत असताना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत व्यवसायात बिकट अवस्था झाली आहे. नाशिकमध्ये कोरोनाची सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. याचा फटका कोरोनाचे कडक निर्बंध लागू करण्याबरोबरच विकेंड लॉकडाउन झाल्यापासून बसत आहे. व्यवसाय पूर्ण ठप्प झाला असून, लॉकडाउनमुळे मोठा धक्का बसला आहे. चर्मकार व्यावसायिकांकडे आता घर खर्च करायला बचतही उरलेली नसून पूर्ण आर्थिक गणित गणित कोलमडले आहे. रस्त्यावर आडोशाला चप्पल, बूट शिवणारे रोजच्या कमाईवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. परंतु, आता पुन्हा लॉकडाउन लागल्याने व्यवसाय करणे कठीण झाले आहे.

Dilip Suranje
एकाच आठवड्यात कुटुंब उद्ध्वस्त! महापालिकेच्या ‘बिटको’तील अव्यवस्थेचे तीन बळी

मदतीची मागणी

आताची कोरोना परिस्थिती कधी निवळेल सांगता येत नसल्याने विविध घटकांना सरकारने आर्थिक मदत देऊ केली आहे. तशी ती चर्मकार व्यावसायिकांना द्यावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, वर्षभरात काहीच कमाई झाली नसून कधी कधी तर बोहनी पण होत नसल्याने मोठे संकट चर्मकार व्यावसायिकासमोर उभे ठाकले आहे. व्यवसाय जरी सुरु झाला तरी गेल्यावर्षीचा अनुभव बघता व्यवसाय पूर्वपदावर येण्यासाठी किती कालावधी लागेल याची चिंता चर्मकार व्यावसायिकांना भेडसावत आहे.

व्यवसाय सुरळीत होत असल्याचे वाटत असताना पुन्हा लॉकडाउन लागला आहे. सरकारने कुठलीही मदत केलेली नाही. व्यवसायाला पर्याय शोधून रोज कुठे तीनशे-चारशे रुपये मिळतात का याचा शोध घेत आहे. दिवसभर बसून असतो घर खर्च कसा चालवतो हे माझ्या जिवाला माहीत आहे.

-दिलीप सुरंजे, व्यावसायिक

Dilip Suranje
सावधान! अंत्यसंस्कारासाठी पैसे घेणारी टोळी सक्रिय; मदतकार्याच्या नावाखाली गोरखधंदा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com