HSC Exam 2024: बारावीचे आवेदनपत्रासाठी मुदतवाढ द्या; कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक महासंघाची मागणी

SSC HSC Exam
SSC HSC ExamSakal

HSC Exam 2024 : इयत्ता बारावीच्‍या मार्च २०२४ मध्ये नियोजित लेखी परीक्षांकरिता ऑनलाइन आवेदनपत्रे दाखल करण्यासाठी शिक्षण मंडळाने मुदतवाढ दिली आहे. (Professor Federation demands Extension of deadline for application of 12th Junior College nashik news)

परंतु दिवाळीच्‍या सुट्या सुरु असल्‍याने ही वाढीव मुदत अपुरी असून, ३० नोव्‍हेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्‍य कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघाने केली आहे.

कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघातर्फे यासंदर्भात माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व सचिव यांच्‍या नावे निवेदन दिले आहे. या निवेदनात नमूद केल्‍यानुसार, राज्‍य मंडळाने बारावीच्‍या परीक्षेचे आवेदनपत्र भरण्यासाठी २० नोव्‍हेंबरपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.

मात्र ६ ते २१ नोव्‍हेंबर या कालावधीत महाविद्यालयांना दिवाळीच्‍या सुट्या आहेत.

SSC HSC Exam
World Cup 2023: सट्टेबाजारात ‘काटे की टक्‍कर’; भारत व ऑस्‍ट्रेलियाचा दर एकसमान...

काही महाविद्यालयांनी त्‍यांना सांकेतांक क्रमांक मिळण्यासाठी अर्ज केले असून, अद्यापपर्यंत त्‍यांना त्‍यांचे सांकेतांक क्रमांक प्राप्त झालेले नाही. या अडचणींमुळे अद्यापपर्यंत काही विद्यार्थी आवेनपत्र भरण्यापासून वंचित आहेत.

या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्‍हणून आवेदनपत्र भरण्यासाठी ३० नोव्‍हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर महाराष्ट्र राज्‍य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय शिंदे, सचिव प्रा. संतोष फाजगे आणि समन्‍वयक प्रा. मुकुंद आंदळकर यांच्‍या स्वाक्षऱ्या आहेत.

SSC HSC Exam
Nashik Loksabha News: लोकसभेच्या नाशिकच्या जागेवर ‘राष्ट्रवादी’चा आग्रह

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com