MNS News : पदाधिकाऱ्यांच्या हद्दीत ढवळाढवळीला प्रतिबंध

MNS News
MNS NewsSakal

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटना बळकटी करताना आता मुंबई व पुण्याच्या धर्तीवर नाशिकमध्येदेखील पदाधिकाऱ्यांना त्यांचे कार्यक्षेत्र सोडून अन्य कार्यक्षेत्रात ढवळाढवळ करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. मात्र, प्रदेश पातळीवरून आलेल्या या आदेशामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. अधिकार घटविण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. (Prohibition of interference with office bearers Discontent among office bearers of MNS Nashik Latest Marathi News)

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबई पुणे व नाशिक या तीन शहरांवर लक्ष केंद्रित केले आहे. संघटना संदर्भात कुठलाही महत्त्वाचा निर्णय होताना या तीन शहरांमध्ये अंमलबजावणी केली जाते. मनसेचे संदीप देशपांडे अविनाश जाधव, बापू वागस्कर तसेच, अन्य पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (ता. १५) पक्षाच्या राजगड कार्यालयात बैठक घेऊन राज ठाकरे यांचा आदेश पदाधिकाऱ्यांपर्यंत पोचविल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

मनसेमध्ये शहरी भागात शहराध्यक्ष, विधानसभा निरीक्षक, विभागप्रमुख, शाखाध्यक्ष, राजदूत याप्रमाणे साखळी असते. सद्यःस्थितीत सामाजिक घटकांवर काम करत असताना शहर म्हणून देखील प्रश्न हाताळले जातात. मात्र यापुढे फक्त ज्या क्षेत्रासाठी नियुक्ती केली आहे. त्या व्यतिरिक्त अन्य पदाधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात ढवळाढवळ करता येणार नसल्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

विधानसभा अध्यक्षांनी त्याच्या क्षेत्रापुरतेच कार्य करायचे. अशा प्रकारच्या सूचना आहेत. या वेळी मनसेचे सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. रतनकुमार इचम, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष सुजाता डेरे, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, संघटक सचिन भोसले, विभाग अध्यक्ष विक्रम कदम, सत्यम खंडाळे, नितीन साळवे, भाऊसाहेब निमसे, योगेश लभडे आदी उपस्थित होते.

MNS News
Nashik Crime News : अंबडमध्ये 52 तडीपार, सातपूरला 1300 टवाळखोरांवरांवर कारवाई

शहराध्यक्षांचे अधिकार कायम

मुंबई व पुणे महापालिका क्षेत्रात या प्रकारे कामकाजाला सुरवात झाली आहे. आता नाशिकमध्ये अंमलबजावणीच्या सूचना दिल्या. पदाधिकाऱ्यांच्या कार्य सीमा एका चौकटीत आणताना महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. जेणेकरून पदाधिकाऱ्यांना त्यांच्या भागात लक्ष केंद्रित करून पक्षाचे नगरसेवक निवडून आणणे शक्य होईल, असा कयास या निर्णयामागे असल्याचे बोलले जाते. शहराध्यक्षांनादेखील ते ज्या भागात वास्तव्य करतात, त्या भागातच त्यांनी काम पहावे अशा सूचना आहे. मात्र, शहर म्हणून आंदोलने किंवा अधिकाऱ्यांना निवेदने देताना शहराध्यक्षांचे अधिकार मात्र कायम ठेवण्यात आले आहे.

यांच्याकडे आहे जबाबदारी

नाशिक पूर्व : माजी महापौर अशोक मुर्तडक, निरीक्षक प्रमोद साखरे, विभागाध्यक्ष विक्रम कदम व भाऊसाहेब निमसे
नाशिक पश्चिम : शहराध्यक्ष दिलीप दातीर, माजी नगरसेवक सलीम शेख, विभागाध्यक्ष योगेश लभडे , नितीन माळी व विजय रणाते
नाशिक मध्य : समन्वयक सचिन भोसले, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, विभागाध्यक्ष सत्यम खंडाळे व नितीन साळवे
देवळाली : प्रदेश उपाध्यक्ष अॅड. रतनकुमार ईचम

MNS News
NMC News : दोष लेखा विभागाचा, भुर्दंड मात्र कर्मचाऱ्यांना!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com