Poshan Ahar Yojana : पोषण आहार योजनेत होणार आमूलाग्र बदल; वैविध्यपूर्ण, पौष्टिक, रुचकर पोषक आहार

Shaley Poshan Aahar
Shaley Poshan Aaharsakal

Poshan Ahar Yojana : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत आगामी काळात शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहार योजनेत आमूलाग्र बदल करून वैविध्यपूर्ण, पौष्टिक, रुचकर पोषक आहार दिला जाणार आहे. आठवड्यातून एकदा अंड्यासह पोषक तत्त्व आणि विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेऊन हा आहार तयार केला जाणार असल्याची योजना शालेय शिक्षण विभागाने आखली आहे.

देशातील शाळांमधून राबविली जाणारी सर्वांत जादा लाभार्थी असणारी योजना म्हणजे शालेय पोषण आहार योजना होय. (radical changes in poshan aahar yojana nashik news)

प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याच्या दृष्टीने, तसेच प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या पटनोंदणीचे व उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य शासनाने १९९५-९६ पासून ही योजना लागू केली आहे.

सुरवातीला स्थानिक स्वराज्य संस्थांतर्फे चालविण्यात येत असलेल्या योजना प्राथमिक शाळा, तसेच अनुदानित खासगी प्राथमिक शाळांतील पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांना ही योजना लागू करण्यात आली. त्यानंतर आठवीच्या विद्यार्थ्यांपर्यंत तिचा विस्तार करण्यात आला. या योजनेचे महत्त्व ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचा समावेश राष्ट्रीय महत्त्वाच्या अशा दहा फ्लॅगशीप प्रोग्राममध्ये केलेला आहे.

विद्यार्थ्यांना आहारातून पोषक तत्त्वे मिळावीत. त्याचबरोबर त्यांनी ते पदार्थ आवडीने खावीत हा विचार करून पाककृती निश्चित करण्यात येणार आहेत. यासाठी दररोज वैविध्यपूर्ण आहार निश्चित करून त्यात डाळ-भात आणि खिचडीबरोबरच हिरवा वाटाणा, व्हेज पुलाव, सोया चंक्स, मसालेभात, वांगी-भात, नाचणी सत्त्व, भगर, शेवगा आदींचा समावेश केला जाईल. जे विद्यार्थी अंडे खातात त्यांना आठवड्यातून एकदा अंडे द्यावे. तसेच अन्य विद्यार्थ्यांना केळीचा पर्याय असेल. आहारात या पदार्थांबरोबर एका गोड पदार्थाचा देखील समावेश राहील.

Shaley Poshan Aahar
Lalit Patil Drug Case : निवडणुकीच्या केंद्रस्थानी ड्रग्ज! दोन्ही सेनेत ललित पाटीलच्या प्रवेशावरून जुंपणार

शाळांमध्ये परसबाग आवश्यक करण्यात आली असून, यातील भाज्या आणि सलाडचा देखील आहारात समावेश करावा, अशा पद्धतीने शिक्षण विभागाचे नियोजन सुरू आहे. तसेच केंद्र शासनाच्या निकषात बसणाऱ्या पदार्थांचा देखील आहारात समावेश करण्यात येणार आहे.

पाककृतींमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य शासनाने समिती स्थापन केली असून, शिक्षणमंत्री दीपक केसरकर समितीचे अध्यक्ष असून, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर, पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेचे डॉ. प्रसाद कुलकर्णी, नितीन वाळके, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे राज्य समन्वय अधिकारी देवीदास कुलाळ, सहसचिव इम्तियाज काझी, अवर सचिव प्रमोद पाटील आदींचा यात समावेश आहे.

स्वयंपाकींना मिळणार प्रशिक्षण

सध्या जेथे केंद्रीय स्वयंपाकगृह आणि बचतगटांमार्फत आहाराचा पुरवठा करण्यात येतो त्यातील पोषण तत्त्व आणि दर्जाची तपासणी करण्यासाठी समिती सदस्यांना प्राधिकृत करण्याचे निर्देश त्याचबरोबर सदस्यांनी आहार तयार करणाऱ्या व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Shaley Poshan Aahar
Nashik News : पांडवलेणी परिसरातील वाहतूक मार्गात बदल; या पर्यायी मार्गाचा करा वापर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com