esakal | शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून सुमारे सात कोटींची वसुली
sakal

बोलून बातमी शोधा

pratap dighavkar farmer.jpg

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर विशेष पोलिस महासंचालक प्रताप दिगावकर यांनी कारवाईचा बडगा उगारत त्यांच्यावर कारवाई करण्याचा सपाटा लावला होता.

शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून सुमारे सात कोटींची वसुली

sakal_logo
By
युनूस शेख

नाशिक : शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर विशेष पोलिस महासंचालक प्रताप दिगावकर यानी कारवाईचा बडगा उगारत त्यांच्यावर कारवाई करण्याचा सपाटा लावला होता. त्यानी नाशिक परिक्षेत्राचा पदभार घेतल्यापासून केवळ महिन्यात त्यानी परिक्षेत्रात (उत्तर महाराष्ट्रात). १९१ गुन्हे दाखल केले. १९९ व्यापाऱ्यानी सुमारे ६ कोटी ७५ लाख ८८ हजार ९८ रुपये इतकी रक्कम शेतकऱ्याना परत केली.

शेतकऱ्यांची फसवणूक करत रक्कम हडपण्याचे अनेक प्रकार 

रक्कम परताव्यामध्ये नाशिक ग्रामिण अव्वल ठरला असून १७७ व्यापाऱ्यानी रकमेचा परतावा केला. तर नंदुबारचे सर्व १४ आज निकाली झाले आहे. तक्रारदार शेतकऱ्याना संपूर्ण रक्कम परत मिळाली. अशी माहिती दिगावकर यानी पत्रकार परिषदेत दिली. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक करत रक्कम हडपण्याचे अनेक प्रकार उत्तर महाराष्ट्रात समोर आले आहे. कुटली कारवाई होत नसल्याने अनेक व्यापाऱ्यांची हिम्मत वाढली होती. अशाना धडा शिकविण्याचा प्रयत्न केला. तो विशेष पोलिस महासंचालक प्रताप दिगावकर यानी. तीन महिन्यापूर्वी त्यानी परिक्षेत्राचा पदभार घेत शेतकऱ्याना फसविणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याची खडसून सांगितले.

हेही वाचा>> अवघ्या पंचक्रोशीचे काळीज हेलावले! जेव्हा लष्करी अधिकारी 'तिरंगा' वीरपत्नी धारित्रींना सुपूर्द करतात तेव्हा...

पिडीत शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

त्यानंतर लगेचच त्यानी पोलिस अधिक्षकाना कारवाईसाठी आदेशीत करत गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली. शेतकऱ्याचा कैयवारी आला. असे म्हणत शेतकऱ्यानी प्रत्यक्ष श्री. दिगावकर यांची भेट घेणे सुरु करत तक्रारी केल्या. गेल्या तीन महिन्यात १ हजार १९२ तक्रार अर्ज प्राप्त झाले. त्यात सर्वाधिक नाशिक ग्रामिणचे १ हजार १६१ तर उवर्रीत ३१ अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुबार येथील अर्जांचा समावेश होता. ४६ कोटी २० लाख ५२ हजार ४३६ रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली. ग्रामिण पोलिसानी अर्जात नमूद काही शेतकऱ्यांची बोलावून त्यांची चौकसी केली. १९१ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल केले. तर २०० व्यापाऱ्यानी शेतकऱ्यांशी तडजोड करुन घेतली. त्यानंतर १९९ व्यापाऱ्यानी कारवाईच्या भितीने शेतकऱ्याना ६ कोटी ७५ लाख, ८८ हजार ९८ रुपय रकमेचा परतावा केला. काही व्यापारी रक्कम परताव्यास तयार आहे. अशाकडून ५ कोटी ८४ लाख, ४५ हजार ६१० रुपयांची रक्कम शेतकऱ्याना काही दिवसातच परतावा होणार आहे. त्यांच्या कारवाईने शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याना चाप बसला आहे. दुसरीकडे पिडीत शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 
हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा 


जिल्हा निहाय आकडेवारी 
जिल्हा प्राप्त अर्ज फसवणूकीची रक्कम गुन्हे आपसात तडजोड रक्कम परतावा करणारे व्यापारी शेतकऱ्याना मिळालेली रक्कम रक्कम परताव्यास तयार 
नाशिक ग्रामिण ११६१ ४४,५७,७४,३५४ १८१ १८३ १७७ ५,५५,१८,५३९ ५७,३१,५,६१० 
अहमदनगर ९ ६१,८२,३८० ७ ०० ५ ५५१,८२,३८० ०० 
जळगाव ४ २५,९२,५३१ ० ३ ६ ९०,००० ५२,५००० 
धुळे ४ ३७,९२,९९२ १ २ ९ ३०,८७००० ६०,५००० 
नंदुबार १४ ३७,१०,१७९ २ १२ २ ३७,१०,१७९ ०० 
परिक्षेत्र ११९२ ४६,२०,५२,४३६ १९१ २०० १९९ ६,७५,८८,९८ ५,८४,४५,६१०  

loading image