Scout Guide Revision Class : स्काउट गाइड जिल्हा संस्थेतर्फे 13 पासून शिक्षकांसाठी उजळणी वर्ग

Teacher
Teacheresakal
Updated on

Scout Guide Revision Class : जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग आणि नाशिक भारत स्काउट-गाइड जिल्हा संस्था व प्रशिक्षण केंद्रातर्फे येत्या गुरुवार (ता. १३)पासून २० जुलैपर्यंत जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील शिक्षकांसाठी एकदिवसीय तालुकानिहाय उजळणी वर्ग होणार आहे. (Revision class for teachers from 13 july by Scout Guide District Organization nashik news)

जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षिकांनी प्राप्त नियोजनानुसार उपस्थित राहण्याचे आवाहन नाशिक भारत स्काउट-गाइडचे मुख्य आयुक्त तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी, स्काउट आयुक्त तथा माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी केले आहे.

शिक्षकांसाठी होणाऱ्या या तालुकानिहाय उजळणी वर्गात स्काउट-गाइड अभ्यासक्रम, समुदाय विकास कार्यक्रम, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील उपक्रम, ऑनलाइन युनिट नोंदणी याबाबत मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती नाशिक भारत स्काउट-गाइड कार्यालयाचे संघटक श्रीवास मुरकुटे, कविता वाघ यांनी दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Teacher
Bsc Nursing Admission : बी. एस्सी. नर्सिंग प्रवेशाची नोंदणी या तारखेपर्यंत मुदत; 21 जुलैला गुणवत्तायादी

गुरुवारी (ता. १३) नाशिक, पेठ, शुक्रवारी (ता. १४) त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या तालुक्यांसाठी वर्ग होतील. शनिवारी (ता. १५) केआरटी हायस्कूल, वणी येथे दिंडोरी, सुरगाणा तालुक्यांसाठी, सोमवारी (ता. १७) जी. एम. डी. आर्टस, बी. डब्ल्यू कॉमर्स आणि सायन्स कॉलेज येथे सिन्नर तालुक्यासाठी, मंगळवारी (ता. १८) कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय,

विंचूर (ता. निफाड) येथे निफाड, चांदवड आणि येवला या तालुक्यांसाठी, बुधवारी (ता. १९) या. ना. जाधव विद्यालय, मालेगाव येथे मालेगाव आणि नांदगाव या तालुक्यांसाठी, तर गुरुवारी (ता. २०) मराठा हायस्कूल, सटाणा (ता. बागलाण) येथे सटाणा, देवळा आणि कळवण या तालुक्यांसाठी उजळणी वर्ग होणार आहेत.

Teacher
Nashik Chhagan Bhujbal : मी कार्यकर्ता म्हणून नव्हे तर नेता म्हणून राष्ट्रवादीत आलो; रोहित पवारांवर पलटवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.