Bsc Nursing Admission : बी. एस्सी. नर्सिंग प्रवेशाची नोंदणी या तारखेपर्यंत मुदत; 21 जुलैला गुणवत्तायादी

Bsc Nursing Admission
Bsc Nursing Admissionesakal

Bsc Nursing Admission : बारावीनंतर बी. एस्सी (नर्सिंग) अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रियेला सुरवात झाली आहे. पात्रताधारक विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी १५ जुलैपर्यंत मुदत असेल.

२१ जुलैला अंतिम गुणवत्तायादी जाहीर करण्याचे नियोजन आहे. प्रवेश फेरीच्‍या वेळापत्रकाची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना कायम आहे. (bsc Nursing admission Registration deadline is 15 july nashik news)

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्‍या प्रवेशासाठी बी. एस्सी. (नर्सिंग) या अभ्यासक्रमासाठी प्रथमच सीईटी सेलतर्फे सीईटी परीक्षा घेण्यात आली. यंदापासून सीईटी परीक्षेसह अन्‍य पात्र प्रवेश परीक्षांच्‍या कामगिरीच्‍या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना कॅप राउंडच्‍या नोंदणीसाठी शनिवार (ता. १५)पर्यंत मुदत आहे.

निर्धारित शुल्‍क भरण्यासाठी रविवार (ता. १६)पर्यंत मुदत असेल. सर्व आवश्‍यक कागदपत्रांची रंगीत स्‍वरूपातील स्‍कॅन कॉपी अपलोड करण्यासाठी १८ जुलैपर्यंत मुदत असेल. प्रक्रियेच्‍या पुढील टप्प्‍यात २१ जुलैला अंतिम गुणवत्तायादी प्रसिद्ध होईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Bsc Nursing Admission
Government Job 2023 : IRCTC मध्ये मोठी पदभरती, BSc. पदवी धारकांना सुवर्णसंधी

तिच्याआधारे पुढील प्रवेश फेऱ्यांचे सविस्‍तर वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. तत्‍पूर्वी नोंदणीकृत विद्यार्थ्यांनाच कॅप राउंडच्‍या नोंदणी प्रक्रियेत सहभागी होता येणार असल्‍याने विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.

१९३ महाविद्यालयांचा समावेश

या प्रवेशप्रक्रियेत राज्‍यभरातील नर्सिंग महाविद्यालयांतील बी. एस्सी नर्सिंग या पदवी अभ्यासक्रमाच्‍या प्रथम वर्षाला प्रवेश दिले जाणार आहेत. यामध्ये सहा शासकीय महाविद्यालये आणि १६३ खासगी महाविद्यालये अशा एकूण १९३ महाविद्यालयांत ही प्रक्रिया राबविली जाणार आहे.

Bsc Nursing Admission
Diploma Agriculture Registration : कृषि पदविका नोंदणीची आजची अखेरची संधी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com