Nashik | मलढोणच्या सरोदे वस्तीवर मध्यरात्री सशस्त्र दरोडा

robbery
robbery esakal

सिन्नर (जि. नाशिक) : मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास सिन्नर तालुक्यातील मलढोण या गावातील सरोदे वस्तीवर दहा ते बारा जणांच्या टोळीने दरोडा टाकला. घराच्या पडवीत झोपलेल्या कुटुंबप्रमुखाच्या डोक्यात बीअरची बाटली फोडून व विटांचा मारा करत दरोडेखोरांनी त्यास गंभीर जखमी केले. घरातील तरुणांशी देखील त्यांची झटापट झाली. महिलांच्या अंगावरील व कपाटातील दहा ते बारा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केल्यावर दुचाकीवरून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या एका चोरट्यास कुटुंबातील तरुणांनी व मदतीस धावलेल्या शेतकऱ्यांनी बेदम मारहाण करून पोलिसांच्या हवाली केले आहे.

डोक्यात फोडली बीयरची बाटली

समृद्धी महामार्गलगत मलढोण-मिरगाव रस्त्यावर वाल्मिक दगडू सरोदे (50) यांची वस्ती आहे. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे सरोदे हे घराच्या पडवीत झोपले होते. शेजारीच खाटेवर अंथरूण घालून त्यांची आई रखमाबाई (80) व पत्नी विमल (46) या झोपल्या होत्या. सरोदे यांना योगेश, तुळशीराम, नितीन व किशोर ही चार मुले असून पैकी दोघांची लग्न झालेली आहेत. हे सर्व जण घरात खोल्यांमध्ये झोपलेले होते. मध्यरात्री एक ते सव्वा वाजेच्या सुमारास दहा ते बारा तरुणांनी वस्तीवर येत पडवीत झोपलेल्या वाल्मिक सरोदे यांच्यावर विटा फेकायला सुरुवात केली. ते उठून आरडाओरड करू लागताच एका चोरट्याने त्यांच्या डोक्यात बीयरची रिकामी बाटली फोडून जखमी केले. तर इतरांनी बाजेवर झोपलेल्या दोन्ही महिलांना खाली ढकलून दिले.

robbery
Nashik | शहरात हत्यांचे सत्र सुरूच, RTO ऑफिसजवळ तरुणाची हत्या
दरोडेखोरांच्या मारहाणीत जखमी झालेले वाल्मिक दगडू सरोदे.
दरोडेखोरांच्या मारहाणीत जखमी झालेले वाल्मिक दगडू सरोदे. esakal

पडवीतून वडिलांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने घरात झोपलेली चारही मुले दरवाजा उघडून बाहेर आली असता दबा धरून बसलेल्या चार ते सहा जणांनी त्यांना लोखंडी गज व काठीने मारहाण करायला सुरुवात केली. घरात प्रवेश करत या चोरट्यांनी दोन्ही सुनांच्या अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. तसेच दोन खोल्यांमधील कपाटाची उचकापाचक करून 10 ते 12 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले.

हाती लागलेल्या चोरट्याचा चांगलाच समाचार

याही परिस्थितीत चारही मुलांनी या चोरट्यांचा प्रतिकार सुरू ठेवला होता. मोबाईल फोनवरून एका मुलाने बाजूचे वस्त्यांवर व गावात निरोप दिल्यावर स्थानिक शेतकरी व तरूण सरोदे वस्तीकडे मदतीसाठी धावले. माणसे येत असल्याचे पाहून चोरट्यांची पळापळ सुरू झाली. जाताना पडवीत झोपलेला तो माणूस कुठे आहे असे चोरटे विचारत होते. माणसे जवळ येत असल्याने काही चोरटे शेतातून समृद्धी महामार्गाच्या बाजूला धावले तर काही जण रस्त्यावर उभ्या केलेल्या दुचाकी घेऊन पळू लागले. याच दरम्यान सरोदे यांच्या एका मुलाने ऋषिकेश राठोड (25) रा. रुई ता. कोपरगाव यास पाठीमागून काठीचा घाव घालून दुचाकीसह खाली पाडले. तर त्याच्या सोबत असलेला एक चोरटा जखमी होऊनही समृद्धी महामार्गाच्या दिशेने पळत गेला.

मदतीला धावलेल्या शेतकऱ्यांसह सरोदे बंधूनी राठोड याचा चांगलाच समाचार घेतला. त्याच्या खिशात मिरचीपूड आढळून आली. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर वावीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते यांनी पोलिस पथक रवाना केले. पोलिसांनी रात्रभर परिसरातील दहा ते बारा किलोमीटरचा परिसर पिंजून काढला. यावेळी चोरट्यांच्या चपला वस्तीवर विखुरलेल्या आढळून आल्या. घरासमोरील शेतात मिरचीपूड, गजाचे वाकलेले तुकडे आढळून आले. चोरट्यांनी जाताना घरातील दोघांचे मोबाईल फोन सोबत नेले. मात्र एका चोरट्याचा मोबाईल तेथेच पडला.

मद्यपान करत वस्तीवर ठेवलेे लक्ष

सकाळी दिवस उजाडताच निफाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ तांबे यांनी सरोदे वस्तीवर येत घटनेची माहिती घेतली. पकडलेल्या चोरट्यास दोडी ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तर सरोदे यांना सिन्नर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची आई व पत्नी यांची ही वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

robbery
राज्यमंत्र्यांच्या अचानक भेटीने जलसंपदा विभागात तारांबळ | Nashik

पकडलेल्या चोरट्याकडून महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली. या प्रकारात सहभागी असलेले सर्वजण 20 ते 25 वयोगटातील असून ते कोपरगाव व सिन्नर तालुक्यातील असल्याचे समोर आले आहे. यातील बहुतांश जण सराईत व गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. पोलिसांची विविध पथके या तरुणांचा शोध घेत आहेत. दरम्यान, सकाळी अप्पर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, सिन्नर व एमआयडीसी पोलिस ठाण्याचे अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, श्वानपथक व तसे तज्ञांनी घटनास्थळी येत तपासासाठी माहिती संकलित केली. श्वानाने घरापासून दीड किलोमीटर शेतातून जात समृद्धी महामार्ग गाठला. समृद्धी महामार्गवर रात्री उशिरापर्यंत आम्ही मद्यपान करत होतो. व तेथून सरोदे वस्तीवर लक्ष ठेवून असल्याचे पकडलेल्या चोरट्याने पोलिसांना सांगितले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com