Satana RTE Ghotala: सटाणा-बागलाणमध्ये आरटीई प्रवेश घोटाळा? जिओ-टॅगिंग फेरफार, अपात्रांना लाभ

आरटीई प्रवेश प्रक्रियेत जिओ-टॅगिंगमध्ये फेरफार, अपात्रांना लाभ देऊन पात्र गरीब विद्यार्थ्यांवर अन्याय; उच्चस्तरीय चौकशी व फौजदारी गुन्ह्यांची पालकांची मागणी
RTE Scam Allegations: GIS Mapping Manipulation Deprives Needy Students in Satana

RTE Scam Allegations: GIS Mapping Manipulation Deprives Needy Students in Satana

Sakal

Updated on

सटाणा : शिक्षणाचा हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत सटाणा शहर व बागलाण तालुक्यात राबविण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार, संगनमत आणि भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप पालक व सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. जिओ-टॅगिंगमध्ये जाणीवपूर्वक फेरफार करून अपात्र विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देण्यात आल्याचा दावा करत या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अन्यथा येत्या २० मे रोजी राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्यात येईल, असा आक्रमक इशारा संबंधित पालक व सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com