esakal | जनधनच्या पैशांबाबत पसरली 'अशी' अफवा... बॅंकेबाहेर सोशल डिस्टंसिंगचा पार फज्जा
sakal

बोलून बातमी शोधा

bank of baroda 2.jpg

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोलमजूरी व रोजंदारी करणारे श्रमिक कामाविना घरी बसून आहेत. हे पैसे आले म्हणून खातेदारांनी बुडत्याला काडीचा आधार या म्हणीप्रमाणे पैसे काढण्यासाठी झुंबड उडवली. काही खातेदारांनी पैसे काढले तर काहीनी पैसे परत जातील म्हणून भर उन्हात उभे राहून आपल्याला मिळतील की नाही याची प्रतिक्षा करतांना दिसत आहे.

जनधनच्या पैशांबाबत पसरली 'अशी' अफवा... बॅंकेबाहेर सोशल डिस्टंसिंगचा पार फज्जा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / ओझर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या जनधन सुरक्षा बँकेत प्रत्येक खातेदाराला पाचशे रुपये जमा झाले असून हे पैसे त्वरीत काढले नाही तर परत जातात ही अफवा गावात पसरल्याने येथील गावातील पोलीस चौकी समोर असलेल्या बँक ऑफ बरोडा पुढे खातेदारांनी मोठी रांग लावल्याने सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला असून भर उन्हात खातेदार पायाला चटके बसत असतांना उभे होते.  बँकेकडून कोणताही पर्यायी व्यवस्था न केल्याने कोरोना काळातील दक्षता धुळीस मिळत आहे. 

उन्हात उभे राहून आपल्याला मिळतील की नाही याची प्रतिक्षा
बँक ऑफ बरोडा शाखेत जनधन योजनेचे सुमारे अकरा हजाराच्यावर खाते असून शुक्रवार पर्यंत जवळपास अकराशे व सोमवार नंतर काही खातेदारांचे पाचशे रुपये खात्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोलमजूरी व रोजंदारी करणारे श्रमिक कामाविना घरी बसून आहेत. हे पैसे आले म्हणून खातेदारांनी बुडत्याला काडीचा आधार या म्हणीप्रमाणे पैसे काढण्यासाठी झुंबड उडवली. काही खातेदारांनी पैसे काढले तर काहीनी पैसे परत जातील म्हणून भर उन्हात उभे राहून आपल्याला मिळतील की नाही याची प्रतिक्षा करतांना दिसत आहे. त्यात काही खातेदारांचे खाते अॅकटिव्ह नाहीत, त्यांची अफवेने घालमेल होत आहे बँकेने गर्दी कमी होण्यासाठी काहीही दक्षता घेतलेली दिसत नाही. लोक मात्र गदी करतच आहे पोलीस निरिक्षक भगवान मथुरे यांनी ब्रँच मॅनेजर प्रविण बावने यांचेशी संपर्क साधून गर्दी कमी करण्यासाठी काहीतरी उपाय योजना करावी अथवा त्यांना ठरावीक वेळ देऊन प्रश्न मिटवावा असे आवाहन केले. गांवातील जनधन योजनेचे हजारो खाते असून यावर काही तरी उपाय शोधावा व ग्राहकांची हेळसांड थांबवावी अशी मागणी होत आहे.

खातेदारांना सांगूनही गर्दी करतात
कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर कर्मचारी वर्ग कमी आहे. खातेदारांना सांगूनही गर्दी करतात. सुटीच्या आधी हजार अकराशे व त्यानंतर सोमवार नंतर काही रक्कम आली आहे. तेच खात्यावर जमा करायचे आहे. मॅनपॉवर कमी असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. - प्रविण बावने - शाखाधिकारी, बँक ऑफ बरोडा

VIDEO : नाशिकमध्ये कसा आढळला दुसरा कोरोना पॉझिटिव्ह? 


आम्ही जनधन खात्याची रक्कम जमा केली आहे. ज्यांना मेसेज गेले त्यांना वाटप चालू असून गर्दी होऊ नये म्हणून बँकेच्या बाहेरच खाते क्रं विचारून सॅनिटायझरचा वापर करून खातेदारांना मास्क शिवाय प्रवेश देत नाही. जनधन योजनेच्या खातेदारांनी पैसे परत जातात, या अफवेवर विश्वास ठेऊ नये हे पैसे कधीही परत जाणार नाही. ते त्यांनाच मिळतील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणीही घाई व गर्दी करू नये - दिगंबर महाडीक, शाखा प्रबंधक महाराष्ट्र बँक

हेही वाचा > होम क्वारंटाइन "आमदार' काही ऐकेना! केला "असा' कारनामा अन् पडले वादाच्या भोवऱ्यात!

loading image