SAKAL Impact : धोकादायक विजेच्या डीपीला लागले आवरण

Casings fitted to hazardous exposed electrical DPs
Casings fitted to hazardous exposed electrical DPsesakal

SAKAL Impact : वडाळा रोडवरील आयशा मशिदीच्या भिंतीस लागून उच्च दाबाची विजेची उघडी डीपी अपघातास निमंत्रण देत होती. यावर त्वरित आवरण लावण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली होती. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’च्या अंकात प्रसिद्ध होताच डीपीस प्लास्टिक कापडाचे आवरण लावण्यात आले. (SAKAL Impact Dangerous lightning DP covered nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Casings fitted to hazardous exposed electrical DPs
Nashik News: जिल्ह्यातील सर्व उद्योग २ जूनला बंद; उद्योजकांच्या बैठकीत एकमुखी निर्णय

वडाळा रोड येथील आयशा मशीद भिंतीस लागून उघडी डीपी होती. वीज वितरण विभागाच्या दुर्लक्षामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून अपघातास निमंत्रण देत होती. मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती.

याबाबत ‘सकाळ’ मध्ये वृत्त प्रसारित होताच घटनेचे गांभीर्य ओळखत मंगळवारी सकाळी वीज वितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून डीपीस प्लॅस्टिक गोणीच्या कापडाचे आवरण लावण्यात आले.

काही प्रमाणात धोका टाळला आहे. नागरिकांनीही काहीसे समाधान व्यक्त केले. असे असले तरी त्यातूनही दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Casings fitted to hazardous exposed electrical DPs
Nashik News: अनियमिताबद्दल कृषी निविष्ठा केंद्रांवर कारवाईची जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com