Nashik News : शहरात एकाच दिवसात तरुणीसह दोघांनी उचलले टोकाचे पाऊल

शहरात रविवारी (ता. २१) एकाच दिवसात तरुणीसह दोन आत्महत्येचे प्रकार घडले.
suicide
suicideesakal

Nashik News : शहरात रविवारी (ता. २१) एकाच दिवसात तरुणीसह दोन आत्महत्येचे प्रकार घडले. गेल्या तीन दिवसात शहरातील पूर्व भागात यासह तीन आत्महत्येचे प्रकार घडले.

विशेष म्हणजे या सर्व प्रकरणात आत्महत्या करणारे तरुण असून २० ते २५ वयोगटातील आहेत. (same day in city two people including young woman took extreme step nashik news)

येथील सामाजिक संस्था, संघटना, कार्यकर्ते, पदाधिकारी व राजकीय नेत्यांनी सातत्याने आत्महत्या करणाऱ्यांना कुटुंबीयांशी, मित्र परिवार अथवा सामाजिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधून आपल्या अडीअडचणी सांगाव्यात. आत्महत्येचे पाऊल उचलू नये असे वारंवार आवाहन करूनही होणाऱ्या आत्महत्या हा चिंतेचा विषय बनला आहे.

आयशानगर भागातील फैजान शेख सादिक (वय २२, रा. ग.नं. ६, आयशानगर) या तरुणाने मित्र, घरी व सहकाऱ्यांना तुमच्यातील एक सहकारी कमी होत असल्याचे सांगून आत्महत्या केली. फैजानने घरातील लोखंडी पाइपला दोरीच्या साहाय्याने बांधून गळफास घेतला. वडील सादिक शेख अहमद यांनी त्याला अत्यवस्थ समजून येथील सामान्य रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल केले.

suicide
Nashik News : सोबतीने बालपण जगलो जगायचे आहे आता आयुष्यही! मोठ्या बहिणीकडून छोटीला नववर्षात किडनी भेट

डॉ. सारिका देवरे यांनी तपासून त्याला मयत घोषित केले. रविवारी (ता.२१) दुपारी पाचला हा प्रकार घडला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. आयशानगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शहरातील रौनकाबाद भागातील तरुणीने आत्महत्या केली. सहेरबानो इफ्तेकार अहमद (वय २२, रौनकाबाद गल्ली नं. १) हिने राहत्या घरी घरातील छताच्या पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला.

रविवारी (ता. २१) रात्री पावणेदहाच्या सुमारास हा प्रकार निदर्शनास आला. तिचा भाऊ जफर अली जहीर अहमद (वय ३५) याने तिला येथील सामान्य रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल केले. डॉ. अबुलैस अन्सारी यांनी तपासून तिला मयत घोषित केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. आझादनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

suicide
Nashik News : महापालिकेत सुरक्षारक्षकांची सेवा खंडित; पावणेदोन कोटींची होणार बचत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com