Nashik Sanjay Raut : "शिवसेना लोकसभेच्या 18 जागा लढवणार" संजय राऊत यांचा दावा

महाविकास ४० जागा जिंकेल
sanjay raut news
sanjay raut newsesakal

Nashik Sanjay Raut : महाविकास आघाडीत लोकसभेच्या जागा वाटप करताना जिंकेल, त्याची जागा असे सूत्र असायला हवे.

तसेच शिवसेनेच्या लोकसभेच्या १८ जागा असल्याने त्या आम्ही लढवणारच असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. (Sanjay Raut statement about Shiv Sena contest for 18 Lok Sabha seats nashik news)

आगामी निवडणुकीत राज्यात ४० जागा महाविकास आघाडी जिंकेल असाही दावा त्यांनी केला. श्री. राऊत हे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आले आहेत.

शुक्रवारी (ता. २) सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, राज्यातील ४८ जागांचा आढावा काँग्रेससह सर्वच पक्षांनी घेतला पाहिजे.

त्यावरून कोणाची ताकद कोठे आहे हे लक्षात येईल. महाविकास आघाडीतील जागा वाटपावर जाहीर चर्चा करता येणार नाही. मात्र प्रत्येक पक्ष आपल्या जागांचा आढावा घेत असून कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहे.

त्यात वावगे असे काही नाही. राज्यात महाविकास आघाडीला ४० जागा जिंकायच्या आहेत, त्यादृष्टीने तयारी सुरू आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

sanjay raut news
Sanjay Raut : संजय राऊतांचे थुंकणे सापडले वादात; राजकीय वर्तुळातून टिका

लोकसभा निवडणूक जिंकणे हे आमचे लक्ष असून त्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचेही कष्ट आहेत. मागील निवडणुकीत शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले होते, त्या अठरा जागा उद्धव ठाकरे यांची शिवसेना लढवेल.

त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्ष हा त्यांच्याबरोबर गेलेल्याचा गळा आवळून खून केल्याशिवाय राहत नाही, हा आमचा २५ वर्षाचा अनुभव आहे. त्यातून ईश्वराने आमची मुक्तता केली.

"राज्यात थुंकण्यावर बंदी आहे का? असा सवाल करताना तशी बंदी असेल, तर सरकारने अध्यादेश काढावा. माझ्या जिभेला त्रास झाला, त्यामुळे माझे दाताखाली आली म्हणून मी थुंकलो. कोणाच्या तरी नावाने थुकलो, असे कोणाला जर वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे.

काही लोकांचे नाव आले आणि जीभ दाताखाली आली हा योगायोग असू शकतो. तसेच ‘चाइल्ड ट्रॅफिकिंग' संबंधी गृह खात्याने हा विषय गंभीरपणे घेण्याची गरज आहे." - संजय राऊत, खासदार

sanjay raut news
Sanjay Raut : 'संजय राऊत स्वतःचे कपडे फाडून रस्त्यावर दगड मारत फिरतील', शिवसेनेकडून थुंकी प्रकरणात टीका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com