Nashik Bribe Crime : चांदवड तालुक्यातील बोराळे ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक लाचलुचपतच्या जाळ्यात

Bribe Crime
Bribe Crimeesakal

Nashik Bribe Crime : चांदवड तालुक्यातील बोराळे ग्रामपंचायतीचे सरपंच - बाकेराव जाधव व ग्रामसेवक आतिश शेवाळे यांना लाचलुचपत विभागाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. वेल्डींग कारागीराकडून लाच स्वीकारताना चक्क सरपंच व ग्रामसेवक या दोघांनाही अटक झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

हि कारवाई लाचलूचपत नाशिक विभागाच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नारायण न्याहळदे, यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस उपअधिक्षक, वैशाली पाटील करीत आहे. (Sarpanch and Gram Sevak of Borale Gram Panchayat in Chandwad Taluka in net of bribery department Nashik Crime news)

तक्रारदार यांनी मध्ये बोराळे ग्रामपंचायतचे लोखंडी जिन्याचे काम केले आहे. केलेल्या कामाचे उर्वरित २००००/- रू त्यांचे किंवा मुलाचे खात्यावर जमा करण्याचे मोबदल्यात सरपंच बाकेराव भाऊसाहेब जाधव यांनी फोनव्दारे तक्रारदार यांचे कडे प्रत्येकी १५,०००/- रू. लाचेची मागणी केली व ग्रामसेवक आतिश अभिमान शेवाळे, कंत्राटी ग्रामसेवक, बोराळे यांनी तक्रारदार यांचे कडे स्वतः साठी ७५००/- व सरपंच जाधव यांचे साठी ७५००/- रू अशी एकुण १५०००/- रू लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक कार्यालयात तक्रार दिली होती.

या तक्रारीवरून ला. प्र. वि. नाशिक पथकाने पडताळणी करून सापळा रचून कारवाई दरम्यान कंत्राटी ग्रामसेवक आतिश अभिमान शेवाळे यांनी तक्रारदार यांचेकडुन १५,०००/- रू. लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम बोराळे ग्रामपंचायत कार्यालयात स्विकारल्याने त्यांना पकडण्यात आले असुन त्यांचेविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा नोंदविण्याची पुढील कार्यवाही सुरू आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Bribe Crime
Jalgaon Crime News : 5 लाखांत घर बळकावल्याची तक्रार; 6 संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

हि कारवाई लाचलूचपत नाशिक विभागाच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नारायण न्याहळदे, यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस उपअधिक्षक, वैशाली पाटील करीत आहे.

या पथकातील उप अधीक्षक वैशाली पाटील, पोलीस नाईक शरद हेंबाडे, पोलीस नाईक राजेंद्र गिते, पोलीस नाईक परशराम जाधव यांनी कारवाई केली.

खुद्द सरपंचानेच ग्रामसेवकाच्या मदतीने आपल्याच ग्रामपंचायतीत काम केलेल्या ठेकेदाराकडून कामाचे बील देण्याच्या बदल्यात लाच मागितल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीत कामे पूर्ण करूनही ठेकेदारांना देयके अदा केलेली नसल्याने दिवसभर तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक तर्फे नागरीकांना आवाहन करण्यांत येते की, कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये कोणी शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असतील तर कृपया लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्रातील कार्यालयाशी संपर्क साधुन निर्भिडपणे या कार्यालयाकडे तक्रार नोंदवावी

Bribe Crime
Nashik Crime News: उंटाची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई; मालेगाव तालुका पोलिसांकडून 43 उंट ताब्यात

कालच जिल्ह्यातील ग्रामसेवकांना आदर्श ग्रामसेवक प्रदान करण्यात आले अन् आज लगेचच जिल्ह्यातील एका ग्रामसेवकाला लाच स्वीकारताना अटक होते. हि बाब चिंताजनक अशीच आहे. मागील पाच महिन्यांत जिल्ह्यातील दिंडोरी, निफाड, इगतपुरी, सिन्नर, चांदवड या तालुक्यातील प्रत्येकी एक असे पाच ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत.

ग्रामविकासाचा महत्वाचा घटक असलेल्या ग्रामसेवकांनी यापुढे तरी जबाबदारीने काम करावे अशी अपेक्षा जनतेकडून केली जात आहे.

Bribe Crime
Dhule Crime News : धुळ्यात कनिष्ठ सहाय्यक अटकेत; पंचायत समिती शाखा अभियंत्याकडेच लाच मागितली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com