esakal | नाशिकचा सत्यजित महाराष्ट्राच्या संघात; कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष 

बोलून बातमी शोधा

satyajit bacchav 1.jpg

भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत महाराष्ट्र संघाची निवड झाली असून, सध्या पुण्यात शिबिर सुरू आहे. या संघात नाशिकचा डावखुरा फिरकीपटू सत्‍यजित बच्‍छाव याचा समावेश असून, त्‍याच्‍या कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागून राहणार आहे. 

नाशिकचा सत्यजित महाराष्ट्राच्या संघात; कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष 
sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत महाराष्ट्र संघाची निवड झाली असून, सध्या पुण्यात शिबिर सुरू आहे. या संघात नाशिकचा डावखुरा फिरकीपटू सत्‍यजित बच्‍छाव याचा समावेश असून, त्‍याच्‍या कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागून राहणार आहे. 

बडोद्यात १० जानेवारीपासून दिसेल स्‍पर्धेची रंगत 
बीसीसीआयतर्फे वडोदरा (गुजरात) येथे १० ते ३१ जानेवारीदरम्यान ही स्पर्धा होणार आहे. कोविड-१९ च्या महामारीने संपूर्ण जगाला वेठीस धरल्यामुळे सर्वच स्तरांवर स्पर्धांना बंदी होती. त्यानंतर आता परिस्‍थिती पूर्वपदावर येत असताना, बीसीसीआयने स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दोन वर्षांपूर्वी या स्पर्धेत सत्यजितने सर्वाधिक बळी मिळवत महाराष्ट्र संघाला अंतिम फेरीत पोचविण्यासाठी हातभार लावला होता. त्यानंतर महाराष्ट्र संघाने उपविजेतेपद पटकावले होते. सत्यजितने गेल्या वर्षीही या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. मात्र, आयपीएलच्या खेळाडूंच्या लिलावात सत्यजितवर बोली लागली नव्हती. यंदा आयपीएल लिलावापूर्वीच मुश्ताक अली ट्रॉफी होणार असल्याने सत्यजितच्या कामगिरीकडे आयपीएल संघांचेही लक्ष असणार आहे.

हेही वाचा - जेव्हा पोटच्या गोळ्यांसह मातेचे मृतदेह दिसले पाण्यावर तरंगताना; शेतकऱ्यांना भरला थरकाप

क्रीडाप्रेमींकडून अपेक्षा

यंदादेखील या स्पर्धेत मागील वर्षाप्रमाणेच उत्कृष्ट कामगिरी करून सत्यजित आयपीएल स्पर्धेत दिसेल, अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींकडून व्‍यक्‍त होत आहे. 
महाराष्ट्राचा सामना गुजरात, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, बडोदा व उत्तराखंड या संघांविरुद्ध होणार आहे. सत्यजितच्या महाराष्ट्र संघातील निवडीमुळे जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोद शहा, सचिव समीर रकटे, तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले. 

हेही वाचा - सावधान! आतापर्यंत पक्ष्यांच्या जिवावर बेतणारे प्रकार आता माणसांवरही; महिलेचा बळी

महाराष्ट्राचा संघ 
राहुल त्रिपाठी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, केदार जाधव, स्वप्नील गुगळे, सत्यजित बच्छाव, अजीम काजी, नौशाद शेख, रणजित निकम, तरंजित ढिल्लोन, निखिल नाईक (यष्टिरक्षक), विशांत मोरे, श्यामसुझामा काजी, जगदीश झोपे, प्रदीप दाढे, मनोज इंगळे, मुकेश चौधरी, दिव्यांग हिंगणेकर, राजवर्धन हंगर्गेकर, धनराज परदेशी व सनी पंडित.