esakal | धक्कादायक! शाळेत विद्यार्थ्यांना आसारामचे धडे...अन् मुख्याध्यापकांकडूनच चक्क परवानगी ?

बोलून बातमी शोधा

asaram 123.png

व्हॅलेंटाइन डे ऐवजी मातृ-पितृ दिन साजरा करावा, याचे धडे देण्यासाठी गेल्या आठवड्यात सातपूरच्या बी. डी. भालेकर शाळेत आसारामभक्तांनी परवानगी न घेता विद्यार्थ्यांसमोर आसारामचे उदात्तीकरण केले होते. ही बाब लक्षात आल्यानंतर महापालिका प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. आयुक्त गमे यांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशी करण्याच्या सूचना शिक्षण विभागाला दिल्या होत्या.

धक्कादायक! शाळेत विद्यार्थ्यांना आसारामचे धडे...अन् मुख्याध्यापकांकडूनच चक्क परवानगी ?
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सातपूरच्या विश्‍वासनगर येथील बी. डी. भालेकर शाळेत कथित आध्यात्मिक गुरू व लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली कारागृहात असलेल्या आसारामचे उदात्तीकरण करण्यासाठी मुख्याध्यापक युवराज शेलार यांनीच परवानगी दिल्याचे प्राथमिक चौकशीत आढळले आहे. त्यामुळे शेलार यांच्यावरच प्रशासकीय कारवाई करण्याचा प्रस्ताव आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. 

महापालिका प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका

व्हॅलेंटाइन डे ऐवजी मातृ-पितृ दिन साजरा करावा, याचे धडे देण्यासाठी गेल्या आठवड्यात सातपूरच्या बी. डी. भालेकर शाळेत आसारामभक्तांनी परवानगी न घेता विद्यार्थ्यांसमोर आसारामचे उदात्तीकरण केले होते. ही बाब लक्षात आल्यानंतर महापालिका प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. आयुक्त गमे यांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशी करण्याच्या सूचना शिक्षण विभागाला दिल्या होत्या. शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी शाळेत जाऊन चौकशी केली. शिक्षक, मुख्याध्यापकांचे जाबजबाब घेतले. मुख्याध्यापक शेलार यांनी खुलासा करताना या संदर्भात कानावर हात ठेवले. जबरदस्तीने आसारामसमर्थक शाळेत घुसल्याचे सांगितले. यावर सेवकांविरोधात विनापरवानगी शाळेत घुसल्याचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना मुख्याध्यापक शेलार यांना केल्या; परंतु शेलार यांनी कुठलीच कारवाई न केल्याने शेलार यांच्यासह दोन शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यानंतरही शेलार व सेवकांवर गुन्हे दाखल केले गेले नाहीत.

हेही वाचा > PHOTOS : "तूच का पेटवून घेते, मीच पेटवून घेतो' असे म्हणून तिच्या हातातील बाटली ओढली...पण...

चौकशीअंती शेलार यांच्या परवानगीवरूनच...

चौकशीअंती शेलार यांच्या परवानगीवरूनच शाळेत सेवकांनी प्रवेश केल्याची बाब समोर आल्याने शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी सूचनेकडे दुर्लक्ष करणे, सेवकांना अनधिकृतपणे प्रवेश दिल्याने शेलार व अन्य दोन शिक्षकांवर प्रशासकीय कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर केला. दरम्यान, या प्रस्तावावरून शेलार यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची दाट शक्‍यता आहे. 

हेही वाचा > "माझ्यासोबत गाडीवर चल" असे सांगून तिला घरी घेऊन गेला..अन्..