sagar sodnar.jpg
sagar sodnar.jpg

शांत जंगलात निपचित पडलेल्या चिमुकल्याजवळ जेव्हा कुटुंबिय पोहचले; अख्ख्या गावालाच धक्का

नाशिक / त्र्यंबकेश्वर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने जंगलात गुरे चारण्यासाठी गेला होता. पण त्यानंतर असे काही घडले की ज्याने कुटुंबियांना धक्का बसला. जंगलात निपचित पडलेल्या चिमुकल्याजवळ जेव्हा कुटुंबिय पोहचले तेव्हा त्यांना काहीच कळेना कि चिमुकल्याला नेमके झाले तरी काय? पण जसजसा खुलासा होत गेला तसा गावकऱ्यांनाच धक्का बसला.

शांत जंगल...निपचित पडलेला चिमुरडा...अन् मग..

वाळविहीर येथील सातवीतील सागर गोविंद सोडनर (वय १४) सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने जंगलात गुरे चारण्यासाठी गेला होता. शांत जंगलात निपचित पडलेल्या चिमुकल्याजवळ जेव्हा कुटुंबिय पोहचले तेव्हा त्यांना काहीच कळेना कि चिमुकल्याला नेमके झाले तरी काय? पण जसजसा खुलासा होत गेला तसा गावकऱ्यांनाच धक्का बसला. त्याचे शरीर काळे निळे पडले होते. त्यावरून रानात सागरला सर्पदंश झाला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. बराच वेळ पडून असलेल्या सागरवर सापाच्या विषाचा परिणाम दिसू लागल्याने तो जंगलातच बेशुद्ध होऊन पडला. त्याच्याबरोबर असलेल्या दुसऱ्या सहकाऱ्याने घरी येऊन सांगितल्याने घरची माणसांनी तातडीने रानात धाव घेतली. त्यानंतर सागरला तत्काळ त्यास घोटी येथे हलविण्यात आले. पण प्रवासातच सागरचा मृत्यू झाला, वाळविहीर येथील सातवीतील सागर गोविंद सोडनर (१४) याचा सर्पदंशाने मृत्यू झाला.

देशात सर्वाधिक सर्पदंशाच्या घटना महाराष्ट्रात

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या एका सर्व्हेच्या माध्यमातून आढळून आले आहे कि, देशात सर्वाधिक सर्पदंशाच्या घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. २०१८-२०१९ मध्ये महाराष्ट्रात ४२ हजार २६ जणांना सर्पदंश झाला असून त्याखालोखाल पश्चिम बंगालचा नंबर लागतो तर राज्यात नाशिक जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्पदंशाच्या धोका वाढतो आहे.

तर राज्यात नाशिक जिल्हा अग्रक्रमावर

एलसेव्हियर या शैक्षणिक जर्नलमध्ये हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. जगभरात झालेल्या एकूण सर्पदंशाच्या घटनांपैकी निम्म्या घटना भारतात घडत आहेत. या अहवालानुसार २०१७-१८ मध्ये महाराष्ट्रात एक लाख लोकसंख्येमध्ये ४२ हजार लोकांना सर्पदंश झाला आहे. तर पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक म्हणजे ३६ हजार लोक, तर तामिळनाडूमध्ये ३६.६ आणि गोवा ३४.५ अशी संख्या आहे. तर राज्यात नाशिक जिल्हा अग्रक्रमावर आहे.

नाशिकमध्ये सापांचे अस्तित्व वाढविण्यास अनुकूल परिस्थिती

२०१८-१९ मध्ये महाराष्ट्रात सर्पदंशाचे प्रमाण वाढले असून दर एक लाख लोकसंख्येमध्ये ३५ लोक सर्पदंशाने दगावत आहेत. गेल्या दोन वर्षात राज्यातील चौदा जिल्ह्यांमध्ये सर्पदंश होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यापैकी नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक सर्पदंश मृत्यूचे प्रमाण आहे. जिल्ह्याची भौगोलिक स्थिती पाहता येथील पश्चिम घाट आणि द्राक्ष शेती, साखर कारखाने आणि वाईनरीज वेगवेगळ्या जातींच्या सापांचे अस्तित्व वाढविण्यास अनुकूल परिस्थिती देतात, असे या अभ्यासात आढळून आले आहे. नाशिक जिल्ह्यात ४२९४, त्यानंतर पालघर ३ हजार २०४, ठाणे २ हजार ६५५, कोल्हापूर २ हजार २९८, पुणे २ हजार १०९, रत्नागिरी १ हजार ९९४ आणि जळगाव १ हजार ८४२ सर्पदंशाची प्रकरणे २०१८-१९ मध्ये नोंद झाली आहेत.

दिरंगाई अनेकदा रुग्णाच्या जिवावरही बेतते

दरम्यान मागील वर्षापेक्षा सर्पदंशाचे प्रमाण वाढले असून यास आपल्याकडे असणारी भौगोलिक परिस्थिती. जिल्ह्यात डोंगराळ भाग आदिक असल्याने येथे सापांचे वास्तव्य अधिक दिसून येते. परिणामी सर्पदंशाच्या घटनामध्ये वाढ होते. अशावेळी रुग्णास तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध ना झाल्याने रुग्ण दगावण्याचा धोका अधिक असतो. तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्पदंश झाल्यानंतर वैद्यकीय उपचार घेण्याआधी तंत्रमंत्राच्या साहाय्याने त्याचा उतारा करण्याकडेही अनेकांचा कल असतो. अंधश्रद्धांमध्ये अडकलेल्या या आजारावर औषधे उपलब्ध असली तरी उपचारांमध्ये दिरंगाई केली जाते. ही दिरंगाई अनेकदा रुग्णाच्या जिवावरही बेतते.

काळजी घेणे महत्वाचे
दिवसेंदिवस सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत असल्याने याबाबतीत अधिक सजगता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. सर्पाचा अधिवास संपल्याने साप घराच्या परिसरात दिसण्याच्या आणि त्याचा दंश होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. त्यामुळे सर्पदंश आणि त्यासंबंधी घ्यावयाची काळजी यासंदर्भात जनजागृती करणे महत्वाचे आहे. असे आवाहन सर्पमित्रांकडून करण्यात येत आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com