esakal | तरुणांनाही लाजवेल अशी साठवर्षीय नागराजची कामगिरी! कार्याबद्दल होतयं कौतुक
sakal

बोलून बातमी शोधा

nagraj 1.jpg

अक्षरश: तरुणांनाही लाजवेल अशी साठवर्षीय नागराज यांची कामगिरी सर्वांनाच भावतेय. नागराज यांना समाजसेवा व पर्यावरणबाबत आस्था असल्याने त्यांच्या या कार्याचे कौतुक होतयं

तरुणांनाही लाजवेल अशी साठवर्षीय नागराजची कामगिरी! कार्याबद्दल होतयं कौतुक

sakal_logo
By
कमलाकर अकोलकर

त्र्यंबकेश्‍वर (जि.नाशिक) : अक्षरश: तरुणांनाही लाजवेल अशी साठवर्षीय नागराज यांची कामगिरी सर्वांनाच भावतेय. नागराज यांना समाजसेवा व पर्यावरणबाबत आस्था असल्याने त्यांच्या या कार्याचे कौतुक होतयं

साठवर्षीय तरुणाची सायकलवरून भारतभ्रमंती

हसन कर्नाटक येथील रहिवासी नागराज गौड हे साठवर्षीय तरुण सायकलवरून भारतभ्रमंती करत पर्यावरण व गोरक्षाबाबत जनजागृतीचा संदेश देत आहेत. त्यांनी नुकतीच येथे भेट दिली. महाराष्ट्र फिरून पश्चिम बंगालकडे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी सायकलवरून आतापर्यंत बारा राज्यांचा प्रवास केला आहे. यात राजस्थान, गुजरात, कच्छ, भुज, हरियाना, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र, कर्नाटक व आता महाराष्ट्र राज्याचा समावेश आहे. आता ते नाशिक जिल्ह्यातील प्रमुख स्थळांना भेटी देऊन पर्यावरण व गोरक्षेबाबत जनजागृती करत फिरत आहेत. रोज चांगल्या रस्त्यावर प्रतिदिवस सत्तर ते शंभर किलोमीटर प्रवास करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - ह्रदयद्रावक! केवळ लेकरासाठीच मातेचे कष्ट अन् धडपड; नियतीचा घाला आला आणि सहा वर्षाचं लेकरू झालं पोरकं

समाजसेवा व पर्यावरणबाबत आस्था

साठ वर्षे वयाच्या गौड हे अविवाहित असून, त्यांचे तीन बंधू हसन कर्नाटक येथे व्यावसायिक आहेत. नागराज यांना समाजसेवा व पर्यावरणबाबत आस्था असल्याने त्यांनी पाणी बचाव, हरियाली बढावा, गोरक्षा करो, असा संदेश देत आपली सायकलयात्रा सुरू ठेवली आहे. त्र्यंबकेश्वर येथून ओरिसा व बंगाल राज्यातील शहरांना भेटी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. जेथे जागा उपलब्ध तेथे मुक्काम व लंगर किंवा अन्नदान करणाऱ्या ठिकाणी भोजन, भक्तांच्या देणगीतून अल्प गरजांची पूर्तता करत असल्याचे त्यांनी सांगितले.  

हेही वाचा - सरपंचपद भोगल्यानंतर भयाण वास्तवाचा सामना! माजी सरपंचांवर आज मजुरीची वेळ 

loading image