Shakambari Navratrotsav : आदिमाया सप्तशृंगीचा आजपासून शाकंभरी नवरात्रोत्सव

आद्यस्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर श्री सप्तशृंगदेवीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवास गुरुवार (ता. १८)पासून प्रारंभ होणार आहे.
Temple of Adimaya. In the second photograph, the idol of Saptsringimata.
Temple of Adimaya. In the second photograph, the idol of Saptsringimata.esakal

Shakambari Navratrotsav : आद्यस्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर श्री सप्तशृंगदेवीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवास गुरुवार (ता. १८)पासून प्रारंभ होणार आहे.

शाकंभरी नवरात्रोत्सवात यंदा अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाच्या पाश्‍र्वभूमीवर २१ जानेवारीपासून पंचदिनात्मक श्रीराम पंचायतन याग होणार आहे. (Shakambhari Navratri festival of Adimaya Saptashrungi from today in vani nashik news)

श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर चैत्रोत्सव व नवरात्रोत्सव या दोन मुख्य उत्सवाशिवाय वर्षभरात विविध उत्सव भक्तिभावाने होतात. रविवारी (ता. १४) आदिमायेच्या धनुर्मास उत्सवाची सांगता झाली. १८ ते २५ जानेवारीपर्यंत शाकंबरी नवरात्रोत्सव होणार आहे. देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाप्रमाणेच शाकंभर नवरात्रोत्सवाचेही तितकेच महत्त्व आहे.

काही कारणास्तव शारदीय नवरात्रोत्सवात घटस्थापना करता आली नाही, त्या भाविकांनी शाकंबरी नवरात्रोत्सवात घटस्थापना केली तरी चालते, अशी श्रद्धा असल्याने नवरात्रोत्सवप्रमाणेच सर्व धार्मिक विधी शाकंबरी नवरात्रोत्सवात होतात. उत्सवात सकाळी सातला श्री भगवतीची पंचामृत महापूजा, दिवसभरात शांतिपाठ, देवीस्तुत्याचे पाठ व पठण होणार आहे.

Temple of Adimaya. In the second photograph, the idol of Saptsringimata.
Shakambari Navratrotsav : आदिमाया सप्तशृंगीचरणी लाखो भाविक नतमस्तक

२१ ते २५ जानेवारीदरम्यान पंचदिनात्मक श्रीराम प्रभू पंचायतन याग होईल. या सर्व धार्मिक विधींसाठी श्री सप्तश्रृंगी देवी ट्रस्ट, पुरोहित संघ व ग्रामस्थ प्रयत्नशील असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उत्सवात सहभाग व्हावे, असे आवाहन ट्रस्ट व पुरोहित संघाने केले आहे.

धाकटे नवरात्र

भूतलावर महाभयंकर दुष्काळ पडला. पाण्याशिवाय जीवमात्रांना जगणे अशक्य झाले. तेव्हा ऋषी-मुनी-देव तपस्वी व भक्तांनी देवीची आराधना केली. तेव्हा प्रसन्न होऊन देवीने तिच्या शरीरापासून वनस्पती म्हणजे शाक निर्माण केली. ही वनस्पती विश्वातील जीवजंतूंना दुष्काळात अन्न म्हणून पुरवून त्यांना जगविले. देवीने उत्पन्न केलेल्या संजीवनी शाक वनस्पतीमुळे जीवरक्षा झाल्याने देवीला शाकंभरी म्हणूनही ओळखू लागल्याची आख्यायिका आहे.

देवीच्या शाकंभरी नवरात्रोत्सास दुर्गाष्टमीच्या दिवशी प्रारंभ होतो. नित्यनियमाने संपूर्ण पूजाअर्चा झाल्यानंतर दही भात व पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून आरती केली जाते. शुद्ध नवमीस शाकंभर नवरात्राची सांगता होते. या दिवसी दूध घोटून त्याचा नैवेद्य दाखविला जातो व प्रसाद वितरित केला जातो.

Temple of Adimaya. In the second photograph, the idol of Saptsringimata.
Shakambari Navratrotsav : पुरोहितांच्या मंत्रघोषात सहस्त्रचंडी महायागास वणी गडावर प्रारंभ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com