esakal | "माझ्या अन्यायाविरोधात मी थेट ‘मातोश्री’वर न्याय मागणार"; कोण म्हणाले..
sakal

बोलून बातमी शोधा

uddhav thakre 1.jpg

ज्या नगरसेवकाने पोलिसांवर हात उचलला म्हणून त्याला जेलमध्ये जावे लागले. ज्याने महिलांच्या हळदी-कुंकवाचे पैसे बुडविले, त्याच्यावर पक्षाने कारवाई न करता ज्याने त्याला जाब विचारला त्याच्यावर पक्षाने कारवाई करणे, हा अन्याय आहे.

"माझ्या अन्यायाविरोधात मी थेट ‘मातोश्री’वर न्याय मागणार"; कोण म्हणाले..

sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

नाशिक / सिडको : ज्या नगरसेवकाने पोलिसांवर हात उचलला म्हणून त्याला जेलमध्ये जावे लागले. ज्याने महिलांच्या हळदी-कुंकवाचे पैसे बुडविले, त्याच्यावर पक्षाने कारवाई न करता ज्याने त्याला जाब विचारला त्याच्यावर पक्षाने कारवाई करणे, हा अन्याय आहे. माझ्यावर झालेल्या अन्यायाविरोधात मी थेट ‘मातोश्री’वर न्याय मागण्यासाठी जाणार असल्याची माहिती सुधाकर जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

शिवसैनिक पदावरून काढण्याचा पक्षप्रमुखांना अधिकार
शिवसेनेचे सुधाकर जाधव आणि शिवसेना नगरसेवक भागवत आरोटे यांच्यात महापौर दौऱ्यात झालेल्या बाचाबाचीनंतर अंबड पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. शिवसेनेने थेट जाधव यांची हकालपट्टी केल्याचे प्रसिद्धीपत्रक जाहीर केले होते. याविषयी जाधव यांनीही शिवसेनेच्या कार्यकारिणीवर आरोप केला. ते म्हणाले, की मी सध्या कुठल्याही पदावर कार्यरत नाही. गेल्या ३२ वर्षांपासून शिवसेनेत असून, सध्या फक्त शिवसैनिक म्हणून आहे. मला शिवसैनिक या पदावरून काढण्याचा अधिकार फक्त पक्षप्रमुखांना आहे. याप्रश्नी दाद मागण्याकरिता लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

हेही वाचा > भरचौकात 'त्याने' थेट वाहतूक पोलिसाच्याच श्रीमुखात भडकावली...नेमके काय घडले?

हेही वाचा > पहाटेची वेळ...मंदिरात आश्रयाला थांबलेले गुराखी दुर्गंधीने अस्वस्थ; शोध घेताच बसला धक्का

loading image
go to top