Nashik News: शॉर्टकट मारत असाल, तर सावधान! गंगापूर कॅनॉल रोड बनला धोकादायक

या मार्गावरून मार्गक्रमण असताना नुकताच कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार कॅनॉलच्या पाण्यात कोसळली.
A car lying in the Gangapur Canal
A car lying in the Gangapur Canal esakal

पंचवटी : वाहन चालवताना नियमांची पायमल्ली केली की, अपघात हा तर होतोच. मात्र, तुम्ही गंगापूर कॅनॉल रोडवरून चारचाकी वाहन घेऊन जाताय का,... घरी जायची घाई अन् ट्रॅफिकमध्ये अडकायचे नाही म्हणून शॉर्टकट मारत असाल तर... सावधान.

कारण या मार्गावरून मार्गक्रमण असताना नुकताच कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार कॅनॉलच्या पाण्यात कोसळली. (shortcuts be careful Gangapur Canal Road became dangerous accident increases Nashik News)

नाशिक शहरात वाढलेली वाहनांची संख्या व मुख्य रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी ही समस्या दिवसागणिक वाढत चालली आहे. यातच सकाळी अन सायंकाळी चाकरमान्यांची कामावर आणि अन् सुट्टी झाल्यानंतर घरी यायची घाई असते.

वाहतूक कोंडीला सामोरे जाण्यापेक्षा उपाय म्हणून बरीच नागरिक हे शॉर्टकट घेत असतात. मात्र, असा शॉर्टकट महागात पडतो, त्याचा प्रत्यय आला एका कारचालकाला. बुधवारी (ता. १०) एक कारचालक हा गंगापूर रोडकडून कॅनॉलवरून चालला होता.

या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती गाडी थेट कॅनॉलमध्ये पडली. दरम्यान चालक हा कसाबसा दरवाजा उघडून बाहेर पडत गाडीच्या टपावर बसला. त्या वेळी एक रिक्षाचालक व जवळील शेतकऱ्याने त्यास दोरीच्या साहाय्याने बाहेर काढले.

नंतर जेसीबीच्या साहाय्याने गाडीदेखील बाहेर काढली. यात यात सुदैवाने फार मोठी घटना टळली. गंगापूर कॅनॉलचा रस्ता हा दहा फूट आहे. गंगापूर रोडकडून बरेचसे नागरिक मखमलाबाद रोड, पेठ रोड, दिंडोरी रोडकडे मार्गस्थ होण्यासाठी बरेचसे नागरिक या रस्त्याचा अवलंब करतात.

A car lying in the Gangapur Canal
Balaji Financial Fraud Crime: बालाजी फायनान्शिअल फसवणूक प्रकरणातील पाचही संशयितांचे जामीन न्यायालयाने फेटाळले

चारचाकी मार्गस्थ होत असताना या रस्त्यावर वाहन चालवणे जिकरीचे होते. त्यामुळेच नागरिकांनी या मार्गाचा अवलंब करताना रस्ता छोटा असून हजारी वाहनांची रहदारी कायम आहे हे लक्षात घ्यावे.

मोठा अनर्थ टळला

सद्यःस्थितीत गंगापूर कॅनॉलला आवर्तनानुसार पाणी सोडलेले आहे. पाण्याचा प्रवाह हा कायम सुरू आहे. बुधवारी कारचालक गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार कॅनॉलच्या पाण्यात गेली.

मात्र, याच कॅनॉलला पाणी नसते तर मात्र, मोठा अपघात झाला असता. सुदैवाने कॅनॉलला पाणी असल्याने मोठा अनर्थ टळला.

A car lying in the Gangapur Canal
Nashik News : नागरिकांसह पशू-पक्ष्यांच्या जिवावर ‘संक्रांत’; कारवाईनंतरही नायलॉन मांजाची सर्रास विक्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com